शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

By योगेश पांडे | Updated: August 31, 2024 20:18 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या परिसरात येऊन देखील दर्शन टाळले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वाहनांचे ताफे  स्मृतिमंदिर परिसरातच पार्क करण्यात आले होते. त्यामुळे आपल्या वाहनात बसण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संघ कार्यालयात पोहोचले, तेव्हा दोघांनी हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन केले.

मात्र, काही क्षणापूर्वी अजित पवारही त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी रेशीमबाग येथील संघ कार्यालय परिसरात गेले होते. मात्र त्यांनी समाधीस्थळाकडे जाणे टाळले. अजित पवार यांना सत्तेत सोबत घेतल्यामुळे संघ परिवारात नाराजीच्या चर्चा आहेत. अशा स्थितीत पवारांनी दर्शन टाळल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे