शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मनोहर जोशींची भेट! चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 19:53 IST

Eknath Shinde : मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित योजनांची माहिती मनोहर जोशी यांनी दिली.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवलेला दिसून येत आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. 

मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोहर जोशी हे शिवसेनेचे प्रमुख नेते होते. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच कामाला येईल. आज जोशी यांनी मला ६० योजनांचे एक पुस्तक दिले. या योजनांची युती सरकारच्या काळात घोषणा केली होती. त्यांनी या योजना राबविण्याचा सल्ला दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

याचबरोबर, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित योजनांची माहिती मनोहर जोशी यांनी दिली.  या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे कोणताही राजकीय अर्थ काढू नका. आम्ही शेतकरी, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी एकनाथ शिंदेनी खास रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी शस्त्रक्रिया झालेले खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतली होती. 

बुधवारी रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता. तर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांण उधाण आले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईPoliticsराजकारण