शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायंत - आलिया भट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 22:55 IST

चुलबुली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर एकत्र आलेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - चुलबुली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर  ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर  एकत्र आलेत. लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांना बोलते केले. यावेळी मी मुंबईची मराठी मुलगी असल्याचे आलिया म्हणाली. आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (महिला) कॅटेगरीतील पुरस्काराने आलियाला गौरवण्यात आले. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
facebook.com/lokmat
 
रणबीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी ११ वर्षांचे होते. रणबीर संजय लीला भन्साळींना अस्टिस्ट करत होता. त्यावेळी काही वाटले नाही. पण ‘सावरियां’मध्ये रणबीरला पाहिले अन् मी त्याच्यावर लट्टू झाले, असे आलिया म्हणाली. रणबीरची ‘बर्फी’मधली भूमिका बेस्ट होती, असेही तिने सांगितले.
 
या मुलाखतीत आलियाला मुंबई शहरात आणखी सुधारणा घडवण्यासाठी तू मुख्यमंत्र्यांना कुठला सल्ला देशील असा प्रश्न विचारला. त्यावर आलिया भट्टने मुंबई शहराबद्दल कोणतीही तक्रार नसून, मुंबई उत्तम शहर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायत. तक्रार करण सोप असत असे सांगितले. 
 
रणबीरची कुठली भूमिका सर्वात जास्त आवडली या प्रश्नावर आलियाने अजूनही रणबीरचा सर्वोत्तम परफॉर्मन्स बाकी असल्याचे सांगितले. त्याची बर्फीमधली भूमिका विशेष आवडल्याचे आलियाने सांगितले. आलियाला कुठला रोल द्यायला तुम्हाला आवडेल असा प्रश्न ऋषी दर्डा यांनी आशुतोष गोवारीकर यांना विचारला. त्यावर त्यांनी आलियाने कमी वेळात अशी उंची गाठली आहे कि, ती कुठल्याही भूमिकेत फिट होईल असे उत्तर दिले. कुठल्या अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर आलियाने परवीन बाबीच्या जीवनावरील चित्रपटात काम करावे असे रणबीरने सांगितले. 

 

ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 

सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा

lmoty.lokmat.com