ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे. आयपीएल मॅच मुंबईतून हलवली तरी चालेल, मात्र आमचं सरकार कोर्टाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करून आयपीएलला पाणी देणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पीचच्या देखभालीसाठी पाण्याचा सर्रास दुरुपयोग होत असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. गुरुवारी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला धारेवर धरलं होतं. दुष्काळामुळे पशु-पक्षी, गाई मरता असून, लोक आत्महत्या करत आहेत. मात्र तुम्ही पीच आणि मैदानांची देखभाल करत असल्याचं म्हणत सरकारला जोरदार चपराक लगावली होती. महाराष्ट्रात जवळपास 20 हून अधिक मॅच खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची कोर्टानं शक्यता वर्तवली होती. त्यावर फडणवीस सरकारनं आयपीएलला पाणी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयनं पाणी न दिल्यास आयपीएलच्या मॅच दुस-या राज्यात खेळवाव्या लागतील, असा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी आयपीएल मॅच हलवल्या तरी पाणी देणार नसल्याचं म्हटलं आहे.
IPL मॅचसाठी पाणी न देण्याचा मुख्यमंत्र्यांचा पवित्रा
By admin | Updated: April 8, 2016 17:04 IST