शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजन दिल्लीच्या कोठडीत

By admin | Updated: November 7, 2015 02:43 IST

गेल्या २७ वर्षांपासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला भारतात आणण्यात अखेर यश आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नेतृत्वातील संयुक्त पथक

नवी दिल्ली : गेल्या २७ वर्षांपासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला भारतात आणण्यात अखेर यश आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नेतृत्वातील संयुक्त पथक शुक्रवारी सकाळी इंडोनेशियातून त्याला घेऊन भारतात दाखल झाले. सध्या तो सीबीआयच्या कोठडीत आहे.छोटा राजनविरुद्ध दिल्ली आणि मुंबईत हत्या, खंडणी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसह सुमारे ७० गुन्ह्यांची नोंद आहे. प्राथमिक चौकशीत त्याने भारतीय सुरक्षा संस्थांना पाकिस्तानात दडून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या हालचालींबाबत माहिती दिल्याचे समजते. भारताच्या सर्वाधिक वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेला ५५ वर्षीय राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन १९८८मध्ये दुबईला पळून गेला होता. दिल्ली पोलीस विशेष शाखा आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांंचे पथक हवाई दलाच्या गल्फस्ट्रीम-३ या विमानाने छोटा राजनला घेऊन पहाटे ५.३०च्या सुमारास पालम विमानतळावर उतरले. विमानतळावरून त्याला थेट सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले. सुरक्षेच्या कारणांमुळे राजनला दिल्लीच्या कुठल्या न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता नसून याऐवजी त्याच्या कोठडीसाठी एका न्यायाधीशांनाच सीबीआय मुख्यालयात आणले जाईल. बनावट पासपोर्टप्रकरणी गुन्ह्याची नोंद आणि महाराष्ट्र सरकारने सोपविलेल्या ७०हून अधिक गुन्ह्यांचा तपास हाती घेण्यासंदर्भातील औपचारिकता पूर्ण होईपर्यंत त्याला येथे ठेवण्यात येईल. माध्यमांच्या प्रतिनिधींना चकमाराजनला येथे आणल्यावर प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी घेरण्याचा प्रयत्न करतील याची सीबीआयला पूर्वकल्पना होती. त्यामुळे अत्यंत चतुराईने त्याला पत्रकारांच्या नजरा चुकवून बाहेर काढण्यात आले. वाहनांचे दोन ताफे निघाले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. छायाचित्रकारांनी या दोन्ही ताफ्यांच्या मागे धावणे सुरू केले तेव्हा विमानतळाच्या एका दरवाजातून तिसरा ताफा निघाला आणि थेट सीबीआय मुख्यालयात पोहोचला.डायलिसीसची गरज नाही सीबीआय प्रवक्त्याच्या सांगण्यानुसार छोटा राजनची प्रकृती चांगली असून त्याला डायलिसीसची गरज नाही. तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने त्याला मुत्रपिंडाचा आजार असल्याचे कळल्यावर डायलिसीसची व्यवस्था करून ठेवली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीबीआयची मुंबई पोलिसांशी चर्चामुंबई : छोटा राजनच्या तपासासाठी सीबीआयने शुक्रवारी मुंबई पोलिसांची भेट घेतली. राजनविरोधात मुंबईत ७८ गुन्हे दाखल आहेत. १९८० सालापासून दाखल असलेल्या या गुन्ह्यांबाबत सीबीआयने पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यासह गुन्हे सह-आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णीसोबत चर्चा केली. गुन्ह्यांची कागदपत्रे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. कामगार नेते दत्ता सामंत, पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे डे यांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप राजनवर आहे.छोटा राजनचा तपास करण्यास मुंबई पोलीस सीबीआयपेक्षा सक्षम आहे. सीबीआयकडे आहेत तीच प्रकरणे हाताळताना नाकीनऊ येत आहे. त्यात छोटा राजनचा तपास सीबीआयकडे देणे म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमान आहे. अशाने मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खचत चालले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार आहे. त्यांनी गृहमंत्रीपदाचा कारभार आपल्याकडे ठेवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यासाठी याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.- सुधाकर सुराडकर, माजी आयपीएस अधिकारीमुंबईमध्ये राजनविरोधात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. याची सर्व माहिती पोलिसांकडे आहे. सीबीआयकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. अशात केवळ छोटा राजनने केलेल्या आरोपामुळे त्याला मुंबई पोलिसांकडे न देता सीबीआयच्या ताब्यात देण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खचणार आहे. - वाय. पी. सिंग, माजी आयपीएस अधिकारीराजनला भारतात आणल्यामुळे त्याची मुंबईतील टोळी सक्रिय होणार आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राजनचा तपास मुंबई पोलिसांकडे असणे गरजेचे होते. मुंबई पोलिसांना वगळून तपास सीबीआयकडे देणे चुकीचे आहे. यामध्ये मुंबई पोलिसांना घेऊनच काम करणे गरजेचे आहे. केवळ राजनने मुंबई पोलिसांच्या ताब्यात आपण सुरक्षित राहाणार नसल्याचे सांगितल्याने हा निर्णय घेण्यात आला असावा. मात्र याचा फेरविचार होणे गरजेचे आहे. कारण मुंबईत पुन्हा गँगवार उफळल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई पोलिसांवर येऊन पडणार आहे.- एम.एन.सिंग, माजी आयपीएस अधिकारी