शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे आमचे राजे! अपमान होईल असे वागणार नाही; शिवसेनेच्या संजय पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 15:15 IST

Sanjay Pawar's Reaction on Rajyasabha Election rumors: संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत, असे संजय पवार म्हणाले.

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहाव्या उमेदवारासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मातोश्रीवरून बोलावणे आल्याचे समजते आहे. संभाजीराजेंकडून शिवसेनेला होकार आला नसल्याने संजय पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. असे असताना पवार यांनी संभाजीराजे आमचे राजे! दैवत, अपमान होईल असे वागणार नाही, असे म्हणत आपल्याला अद्याप वरिष्ठांकडून कोणतेही संकेत आलेले नाहीत असे स्पष्ट केले आहे. 

Sambhajiraje Chhatrapati: मोठी घडामोड! कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाला 'मातोश्री'चं बोलावणं, संभाजीराजेंचं ठरेना, शिवसेना मागे हटेना!

संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. ते आमचे राजे आहेत. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत. राजेंचा माझ्याकडून असा कुठला अपमान व्हावा अशी माझी अपेक्षा नाही, असे संजय पवार यांनी सांगितले. परंतू जर उद्धव ठाकरेंनी लढ म्हटले तर मला लढावेच लागेल, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. 

Sambhaji Raje : संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा; मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुंबईकडे रवाना, सर्वांचं लागलं लक्ष

गेल्या ३० वर्षांत मी अनेक चढऊतार पाहिले. सामान्य कार्यकर्ता ते तालुकप्रमुख, नगरसेवक जिल्हाप्रमुख ही पदे सांभाळली. परंतू कधी पक्षाकडून अपेक्षा केली नाही. शिवसेनेत काम पाहून संधी दिली जाते. जर संधी मिळाली तर ती कोणाला नको असते, असे सांगत जर पक्षाने राज्यसभेसाठी संधी दिली तर आपण ती लढण्यास तयार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. 

संभाजीराजे मुंबईकडे निघाले... छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शिवबंधन बांधण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू संभाजीराजे पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले होते. आज सकाळी पुन्हा संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत. निघण्यापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेनेने कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांना संजय पवार यांना मातोश्रीवर येण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा