शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ यांच्या उपचारावरून गदारोळ, उपचारात कमतरता पडू दिली जाणार नाही - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:20 IST

बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यावरून सलग दुस-या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी झाली. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू दिली जाणार नाही, असे सांगत या विषयावर पडदा टाकला.

मुंबई - बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यावरून सलग दुस-या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी झाली. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू दिली जाणार नाही, असे सांगत या विषयावर पडदा टाकला.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी भुजबळांच्या उपचारावरुन सभागृहात झालेल्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. एका आरोपीच्या उपचाराबाबत चर्चा करताना जे.जे. रूग्णालयापेक्षा खासगी रूग्णालये चांगली आहेत, असे सांगून सरकारी रुग्णायालयांचा अवमान करण्यात आला. सरकारी रूग्णालयांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी रावतेंनी केली. यावर, सरकारी रूग्णालयावर अथवा जेजेवर अविश्वास व्यक्त करण्यात आला नाही. भुजबळ यांना तपासणीसाठी रांगेत थांबावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, रावते यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. या गदारोळामुळे सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.खासगी रुग्णालयातील उपचाराची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा लावून धरली. तर, सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही. गोंधळ घालत कामकाज रेटण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप सुनिल तटकरे यांनी केला. भुजबळ आरोपी असले तरी त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. कसाब, तेलगीसारख्या लोकांना चांगले उपचार मिळतात मग भुजबळांना का नाही, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना, भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या तब्बेतीची योग्य काळजी घेण्यात येत आहे, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात सांगितले.भुजबळांवर योग्य उपचारहोतील : मुख्यमंत्रीसरकारकडून तुरुंगात असलेल्या व्यक्तीच्या बाबत कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. मात्र छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले असल्याने त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार व्हावेत यासाठी तुरुंग प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी या बाबत औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्र