शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार; महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 07:16 IST

८५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात ईडीने २०१६ मध्ये छगन भुजबळ, पंकज व समीर भुजबळ यांच्यासह ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन सा. बां. मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यातील तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. ईडीने या तिघांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी संमती दर्शवली आहे.

८५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात ईडीने २०१६ मध्ये छगन भुजबळ, पंकज व समीर भुजबळ यांच्यासह ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. खटल्याची सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे सुरू आहे. यातील सुनील नाईक, सुधीर सालस्कर, अमित बलराज या आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट व ॲड. दीप्ती कराडकर यांनी बाजू मांडली. 

 सत्य उघड करा... न्यायालयाने इतर आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर सुनावणी घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा युक्तिवाद करीत ॲड. मर्चंट यांनी संबंधित तीन आरोपींच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली आणि तिघांच्या अर्जांवर ईडीला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. ईडीने बुधवारी त्यास मंजुरी दिली. ईडीतर्फे ॲड. सुनील घोन्साल्वीस यांनी उत्तर सादर केले. त्यात त्यांनी म्हटले की, सीआरपीसी सेक्शन ३०६ नुसार माफीचा साक्षीदार या तिघांना बनवले जाणार असून त्यांनी सर्व सत्य गोष्टी उघड कराव्यात.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ