शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील छगन भुजबळांचा भूखंड : एमईटीची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला (एमईटी) नवी मुंबईतील सानपाडा येथे दिलेला ३४९१.१६ चौरस मीटरचा भूखंड सिडकोने जानेवारीत परत घेतला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला (एमईटी) नवी मुंबईतील सानपाडा येथे दिलेला ३४९१.१६ चौरस मीटरचा भूखंड सिडकोने जानेवारीत परत घेतला. एमईटीने दिलेल्या मुदतीत भूखंडावर शाळेची इमारत न बांधल्याने सिडकोने भूखंड परत घेतला. या निर्णयाला एमईटीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने संबंधित भूखंड ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश सिडकोला मंगळवारी दिले.सानपाडा येथील सेक्टर १५ मध्ये एमईटीच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, २००३ पासून संबंधित भूखंड एमईटीच्या ताब्यात असूनही शाळेची इमारत पूर्ण न बांधल्याने सिडकोने १० जानेवारी २०१८ रोजी एमईटीला नोटीस बजावत भूखंडाचा ताबा घेतला. सिडकोच्या या निर्णयाला एमईटीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.याचिकेनुसार, २००३ मध्ये एमईटी आणि सिडकोमध्ये करार झाला. याद्वारे सिडकोने एमईटीला ३,४९१.१६ चौरस मीटर भूखंड १० वर्षांच्या भाडेकरार तत्त्वावर दिला. चार वर्षांत संबंधित भूखंडावर शाळेची इमारत बांधण्याची अट कराराद्वारे घातली. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या न मिळाल्याने शाळेच्या इमारतीचे बांधकाम रखडले. एमईटीने सिडकोला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली आणि सिडकोने विनंती मान्य करत १७ आॅक्टोबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली. दरम्यान, १४ सप्टेंबर २०१७ रोजी एमईटीला महापालिकेकडून बांधकाम करण्यासंबंधी परवानगी मिळाली.‘सिडकोने दिलेली मुदतवाढ संपण्याच्या ३३ दिवस आधी पालिकेने एमईटीला बांधकामासाठी परवानगी दिली. ३३ दिवसांत शाळेचे बांधकाम पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे सिडकोला सर्व काम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदतवाढ देण्यासंबंधी अर्ज केला. मात्र, त्या अर्जाचा विचार न करताच सिडकोने १० जानेवारी २०१८ रोजी नोटीस बजावून संबंधित भूखंडाचा ताबा घेतला. आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांकडून परवानग्या मिळवण्यासाठी ट्रस्टने २.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. ते व्यर्थ जातील. तसेच सध्या प्रवेश दिलेल्या मुलांचे भवितव्यही टांगणीवर आहे. त्यामुळे सिडकोचा हा निर्णय रद्द करावा आणि एमईटीला शाळेचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत द्यावी,’ अशी विनंती एमईटीने याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ