शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘जनधन’च्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: May 3, 2015 01:11 IST

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या प्रसारासाठी बेरोजगारांची भरती करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

विजय मोरे, नाशिकप्रधानमंत्री जनधन योजनेच्या प्रसारासाठी बेरोजगारांची भरती करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, स्मार्ट फोन पुरवण्यात येत असल्याचेही आमिष जाहिरातींद्वारे दाखवले जात आहे.जनधन योजनेचा प्रसार करण्यासाठी मुले / मुली हवी आहेत, मोबाइलवरून पार्ट / फुलटाइम लघुसंदेश (एसएमएस) पाठवून महिना १८ ते ६० हजार रुपये कमवा. या कामासाठी आवश्यक असलेला मोबाइल, लॅपटॉप फ्री़ अशा प्रकारच्या जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये देऊन बेरोजगारांची फसवणूक करण्याचा नवीन फंडा राज्यात सुरू झाला आहे़ नाशिकजवळील नानेगावमधील महाविद्यालयीन युवतीची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे़बारावीची परीक्षा दिलेल्या भारती काळे या विद्यार्थिनीने जाहिरातीवरील नंबरवर आपला पत्ता पाठविला़ त्यानंतर बोगस कंपनीतील तोतया अधिकारी श्वेता रुही व अनुपम उपाध्याय यांनी फोन करून स्टेट बँक आॅफ इंडियातील खाते नंबर देऊन त्यावर २ हजार ६२५ रुपये भरण्यास सांगितले़ त्यानुसार भारतीने नानेगाव बँकेत रक्कम भरली असता रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर लॅपटॉप व मोबाइलसाठी आणखी ८ हजार ५००, ६ हजार आणि १० हजार रुपयांची मागणी भामट्यांनी केली व त्यानुसार भारतीने बँकेच्या नानेगाव व देवळाली शाखेत पैसे भरलेही़ भारतीला पुन्हा १३ हजार रुपये भरण्यास सांगून त्यानंतर तुमच्या अकाउंटवर १ लाख ४० हजार रुपये जमा होतील़ त्यातून तुम्ही शहरातील कोणत्याही दुकानातून लॅपटॉप व मोबाइल विकत घ्या व त्याचे बिल आम्हाला पाठवा. तसेच उर्वरित रक्कम तुमच्या कामाचा अ‍ॅडव्हान्स म्हणून स्वत:जवळ ठेवा, असे सांगितले, मात्र तिला संशय आला़ तिने पोलीस खात्यात कर्मचारी असलेल्या आपल्या आत्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले़;मात्र तोपर्यंत सुमारे २७ हजारांची रक्कम संबंधित खात्यावर तिने भरली होती़बेरोजगारांची नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे फसवणूक होत असून, तक्रारीसाठी कोणी पुढे आलेले नाही़ भारती मात्र पोलिसांत तक्रार नोंदविणार आहे़