शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चव्हाण सर्वात लाचार मुख्यमंत्री - खडसे

By admin | Updated: June 1, 2014 16:03 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १ -   सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांशी जमत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.   

उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशन होत असून विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सत्ताधारी आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहे. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधकांनी नेहमी प्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. सरकारला दलित महिलांवर होणा-या अत्याचाराशी घेणदेणे नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला जात आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. राज्यात महायुतीला मतदान केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील जनतेला धमकावत असून त्यांना वीज तोडण्याची धमकीही दिली जात आहे असा गंभीर आरोप खडसेंनी केला. यंदाच्या अधिवेशनात सिंचन घोटाळ्याचा अहवाल पटलावर यावा यासाठी पाठपुरावा करु असे खडसेंनी सांगितले. 

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विनोद तावडेंनी केली.मुख्यमंत्री स्वच्छ असल्याचा दिखावा करत असून ते भ्रष्टांची पाठराखणच करत आहेत. आदर्शमधील अधिका-यांनी त्यांनी सेवेत का घेतले असा सवालही तावडेंनी उपस्थित केला. गारपीट ग्रस्त शेतक-यांना अपुरी मदत केल्यावरही तावडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्य सरकार कंत्राटदारांच्या बाजूला झुकली असून या सरकारने मोदींकडून काही तरी शिकायला पाहिजे असा टोलाही तावडेंनी लगावला. 

तर अजित पवार, आर.आर. पाटील व मुख्यमंत्री हे तिघे सरकारमधील खलनायक असून पराभवानंतरही आघाडी सरकारचे नेते सुधरायला तयार नाही. अजित पवार म्हणजे महाराष्ट्रावरचा कलंक आहे अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.   या संपूर्ण पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाचे नेते राज्य सरकारवर निर्लज्ज, लाचार, कलंक अशा बोच-या शब्दात टीका करत असल्याने यंदाच्या अधिवेशनात विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरतील असे दिसते.