शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

चौहानांच्या हकालपट्टीला राज्यमंत्र्यांची बगल

By admin | Updated: October 21, 2015 02:27 IST

एफटीआयआयमधील २००८च्या विद्यार्थ्यांचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ उपलब्ध करून देण्यात येतील, केवळ इतके आश्वासन देण्यापलीकडे केंद्रीय माहिती

पुणे : एफटीआयआयमधील २००८च्या विद्यार्थ्यांचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ उपलब्ध करून देण्यात येतील, केवळ इतके आश्वासन देण्यापलीकडे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी कोणतीही ठोस घोषणा केली नाही. उलट संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांची हकालपट्टी करण्याच्या स्टुडंट असोसिएशनच्या मागणीला बगल देत ‘गजेंद्र चौहान हा वादाचा मुद्दा नाही’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांची त्यांनी बोळवण केली.चौहान यांच्यासह इतर सदस्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी १३१ वा दिवस होता. आजपर्यंत विद्यार्थ्यांची मंत्रालयाच्या प्रतिनिधींबरोबर तीन वेळा बैठक झाली. मात्र तारीख पे तारीख’च्याव्यतिरिक्त काहीही साध्य झाले नाही. १० आॅक्टोबरला झालेल्या बैठकीत राज्यवर्धन राठोड यांच्याबरोबर एक बैठक होईल; त्यामध्ये आंदोलनावर काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र पुन्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यापलीकडे राठोड यांनी कोणतीच ठोस भूमिका जाहीर केली नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू, एवढेच आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)