शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेपोटी महिलेला दिले चटके

By admin | Updated: May 15, 2017 06:33 IST

‘तुझ्या अंगात सैतान शिरलेला आहे, तो बाहेर काढावा लागेल,’ असे म्हणत एका तीसवर्षीय महिलेला पेटलेल्या कापराचे चटके देण्यात आले आहेत.

सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : ‘तुझ्या अंगात सैतान शिरलेला आहे, तो बाहेर काढावा लागेल,’ असे म्हणत एका तीसवर्षीय महिलेला पेटलेल्या कापराचे चटके देण्यात आले आहेत. ही घटना तालुक्यातील मौजे उधवा येथे घडली असून, याबाबत तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी भगतगिरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. उधवा गावातील पिंकी (सुरेखा) चौधरी हिला नेहमी दृष्टांत व्हायचे. ही गोष्ट तिने लोकांना सांगताच, तिला तुझ्या अंगात सैतान शिरला असून, तो बाहेर काढण्यासाठी गावातीलच ज्योत्स्ना माच्छी या भगतगिरी करणाऱ्या महिलेला भेटण्याचा सल्ला देण्यात आला. अंधश्रद्धाळू महिलांनी तिच्या मनात सैतानाविषयी भरवून दिल्याने ती उताऱ्यासाठी तयार झाली. तिकडे जाताच सैतान काढण्यासाठी तिने पिंकीला पेटत्या कापराचे चटके देण्यास सुरुवात केली. मात्र, थोड्याच वेळात या प्रकारामुळे आपल्याला चटके देऊन जखमी केल्याचे लक्षात आल्यावर, शुक्रवारी घडलेल्या या घटनेबाबत तलासरी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच, ज्योत्स्नाला अटक करण्यात आली.