शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

‘चारित्र्यवान’च पोलिंग एजंट

By admin | Updated: February 10, 2017 03:29 IST

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांसह उपद्रवी घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा धडाका लावलेला असतानाच मतदारांना

पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांसह उपद्रवी घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा धडाका लावलेला असतानाच मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत त्यांना पोलिंग एजंट म्हणून नेमण्यास पोलीस मज्जाव करणार आहेत. पोलिंग एजंटसाठी ज्यांची नावे दिली जातील, त्यांची चारित्र्य पडताळणी करण्याचे बंधन पोलीस घालणार आहेत. पुणे महापालिकेच्या १६२ तर पिंपरी- चिंचवडच्या १२८ जागांसाठी होणारी निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. उमेदवारांचा प्रचार धडाक्यात सुरू झालेला असतानाच प्रशासकीय पातळीवरही कामाची लगबग सुरू झालेली आहे. पोलिसांसाठी तर ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. प्रचारापासून ते निकाल लागेपर्यंत कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. यासोबतच गुप्त अहवाल तयार करण्याचे आणि सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्याची दुहेरी जबाबदारीही पोलिसांना पार पाडावी लागत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली असून, अनेक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेले आहे. यासोबतच उपद्रवी आणि मतदारांवर प्रभाव पाडू शकणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान कक्षांमध्ये सर्व पक्षांकडून नेमण्यात आलेले पोलिंग एजंट बसवले जातात. या पोलिंग एजंटची नावे आधीच आयोगाकडे द्यावी लागतात. त्यांना नेमके काय करायचे असते, याचेही प्रशिक्षण दिले जाते. अनेकदा हे पोलिंग एजंट स्थानिक, किंबहुना राजकीय पक्षांशी संबंधित असतात.