शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

छोटा राजनवर पुरवणी आरोपपत्र दाखल

By admin | Updated: August 6, 2016 05:11 IST

ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने विशेष मकोका न्यायालयात कुख्यात गँगस्टर छोटा राजनवर आरोपपत्र दाखल केले

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने विशेष मकोका न्यायालयात कुख्यात गँगस्टर छोटा राजनवर आरोपपत्र दाखल केले. जे. डे अंडरवर्ल्डवर पुस्तक लिहीत होते, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी डे यांची हत्या करण्यात आली, असा दावा सीबीआयने आरोपपत्राद्वारे केला आहे. ५ जुलैला विशेष मकोका न्यायालयाचे न्या. एस. एस. आडकर यांनी सीबीआयला एका महिन्यात जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले होते. अन्यथा मुंबई क्राइम ब्रँचने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसारच आरोप निश्चित करण्याची तंबी दिली होती. सीबीआयने शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. ४१ जणांची साक्ष नोंदवली आहे. अन्य आरोपी रवी राम याला साक्षीदार केले आहे. ‘रवी राम याला आधीच साक्षीदार करण्यात आले होते. मात्र राजन आणि अन्य आरोपींमध्ये रवी राम महत्त्वाचा दुवा असल्याचे नंतर समजले,’ असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. रामने राजनच्या सांगण्यावरून मोबाइलची २० सीमकार्ड्स मारेकऱ्यांना व या कटात सहभागी असलेल्यांना पुरवली होती. आरोपपत्रात पोलिसांनी पत्रकार जिग्ना वोरा आणि छोटा राजनमधील संवादाचे ट्रान्सस्क्रिप्टही जोडले आहे. जे. डे अंडरवर्ल्डवर पुस्तक लिहीत होते, त्यांना रोखण्यासाठी छोटा राजनने डे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. डे यांनी छोटा राजनवर काही लेख लिहिले होते म्हणून राजन अस्वस्थ होता. पत्रकार वोरा हिचे डे यांच्याशी व्यावसायिक वैमनस्य असल्याने तिने छोटा राजनला डे यांच्याविरुद्ध चिथावले. २०११मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले. सतीश कालीया, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगवने, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ आणि दीपक सिसोदिया हे आरोपी आहेत. २०१२ला वोरावर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. सध्या ती जामिनावर आहे. (प्रतिनिधी)