शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्याची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 04:48 IST

भष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदाराची तडकाफडकी सशस्त्र दलात उचलबांगडी करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतील वाहतूक शाखेतील अधिकाऱ्याकडून होणाऱ्या भष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदाराची तडकाफडकी सशस्त्र दलात उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रामाणिक पोलिसाच्या अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या गळचेपीबाबत खात्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अंमलदारांना वाहतूक शाखेत पाच वर्षांचा कालावधी असताना अडीच वर्षे पूर्ण झाली असताना त्यांची प्रशासकीय कारणे दाखवून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकांसह १० अंमलदारांच्या मंगळवारी प्रशासकीय कारणास्तव सशस्त्र पोलीस दल (एल-ए) बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांकडून आलेल्या गोपनीय अहवालानुसार संबंधितांच्या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र त्यामध्ये दिंडोशी वाहतूक शाखेतील हवालदार सुनील टोके यांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची लूटमार केली जात असल्याबाबत पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याबाबत काहीही कारवाई न झाल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांकडे पुरावे उघड केले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांच्या बदल्या करून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर सुनील टोके हे सातत्याने शाखेतील व चौकीतील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या ‘आॅर्डली’कडून केल्या जाणाऱ्या गैरव्यवहाराबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागवून कारवाईची मागणी करीत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जावर आयुक्त पडसलगीकर यांच्या सूचनेनूसार दोन महिन्यांपूर्वी ‘क्राइम ब्रँच’कडून तपास करण्यात येत होता. मात्र संबंधितांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकरण दाबण्यात आले. त्यानंतर टोके यांना पुन्हा जबाबासाठीही बोलावण्यात आले नाही. त्यानंतरही टोके यांनी खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आयुक्त/ वाहतूक सहआयुक्त यांना अर्ज करीत होते. त्यामुळे अडचणीत येत असलेल्यांनी त्यांची अन्यत्र बदली करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)>आरटीआयचा वापरहवालदार टोके हे आरटीआयचा वारंवार वापर करून अधिकाऱ्यांना अडचणीत आणत असल्याने प्रभारी अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालानुसार त्यांनी सशस्त्र दलात बदली करण्यात आल्याचे प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सुनील टोके यांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची लूटमार केली जात असल्याबाबत पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.