शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१२ हजार भारतीय हज यात्रेकरूंच्या श्रेणीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:04 IST

अजेझिया गटात समावेश; मक्का येथे निवासस्थानाचा तुटवडा असल्याने अन्य ठिकाणी व्यवस्था

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : या वर्षी हज यात्रेसाठी नंबर लागलेल्या आणि मक्का मरहमच्या परिसरात निवासस्थान निश्चित झालेल्या जवळपास ११ हजार ९२९ भाविकांचा हज श्रेणीचा (कॅटेगिरी) प्रवास बदलण्यात आला आहे. त्यांना आता नॉन कुकिंग नॉन ट्रॅव्हल्स (एनसीएनटीझेड) श्रेणीतून वगळून त्यांचा समावेश अजेझिया या गटात करण्यात आलेला आहे. मक्कातील धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी आता त्यांना वाहनाचा वापर करावा लागणार आहे.

सौदी अरेबियाच्या दूतावासाने मक्का मुकरमा येथे अतिरिक्त घरांची मागणी नामंजूर केल्यामुळे जवळपास १२ हजार जणांची आता थोड्या दूरच्या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी ‘हज यात्रा’ ही एक असून दरवर्र्षी सौदी अरेबियात भरत असते. त्यासाठी जगभरातील मुस्लीम बांधव लाखोंच्या संख्येने यात्रेत सहभागी होत असतात. भारतातील यात्रेकरूंसाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून नियोजन केले जाते. या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी हज कमिटीची तयारी अंतिम टप्यात असून ‘एनसीएनटीझेड’ गटातून भरलेल्या १२ हजार यात्रेकरूंची नावे घरांच्या कमतरतेमुळे वगळण्यात आली. रविवारी त्याबाबतची यादी हज कमिटीच्या संकेतस्थळावर जाहीर झाली असून भाविकांनी त्याची दखल घेऊन संभ्रम दूर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.चिंतेचे कारण नाहीमक्का मकुरमा येथे अतिरिक्त निवासस्थानांची मागणी सौदी दूतावासाने नाकारल्याने यात्रेकरूंच्या कॅटेगिरीत बदल केला आहे. त्यामुळे त्यांची निवासव्यवस्था थोड्या दूरच्या अंतरावर असेल; मात्र त्यामुळे फारसे चिंतित होण्याचे कारण नाही. आणखी घरांची उपलब्धता झाल्यास त्यामध्ये स्थान दिले जाणार आहे.- डॉ. एम. ए. खान,मुख्य कार्यकारी अधिकारी,हज कमिटी आॅफ इंडियाअसे आहेत हज यात्रेसाठीचे दरहज यात्रेसाठीचा खर्च हा देशभरातील प्रस्थान करावयाच्या विमानस्थळानुसार निश्चित करण्यात आला आहे. मुंबईतून जाणाºया प्रवाशासाठी ‘एनसीएनटीझेड’ श्रेणीसाठी एकूण २ लाख ७७ हजार ९५० रुपये तर अजेझिया श्रेणीसाठी २ लाख ४० हजार ९०० इतका खर्च आहे.च्औरंगाबाद येथून जाणाºया भाविकांना दोन्ही प्रकारांमध्ये अनुक्रमे २ लाख ७३ हजार ०५० व २ लाख ३६ हजार इतका असणार आहे. त्यासाठीचे संपूर्ण शुल्क भरण्याची अंतिम मुदत २० जूनपर्यंत आहे. देशभरातील एकूण २१ विमानतळांवरून भाविकांना नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आणखी ५०० महिलांना यात्रेची संधीच्हज यात्रेला जाण्यास इच्छुक असूनही हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने सोडतीत नंबर न लागलेल्या किंवा मूळ अर्जात नाव समाविष्ट नसलेल्या तब्बल ५०० महिलांना यात्रा करण्याची संधी मिळेल.च्कुटुंबातील पुरुषाबरोबर (मेहरम) त्यांचे नाव यात्रेसाठी विशेष बाब म्हणून निश्चित करण्यात आले आहे. पती, वडील, भाऊ किंवा मुलगा यांचा कोट्यात क्रमांक लागला आहे; मात्र महिलेला विविध कारणांमुळे प्रवेश मिळाला नव्हता अशा या ५०० महिला आहेत.च्संबंधितांनी पासपोर्टसह वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ३० मेपर्यत संबंधित राज्य हज कमिटीकडे करायची आहे. त्यांच्याकडून ५ जूनपर्यंत केंद्रीय हज कमिटीकडे ती जमा झाल्यानंतर त्यांचा हज प्रवास निश्चित होईल, असे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकबुल खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यंदा २,३०० महिलास्वतंत्रपणे करणार यात्राच्केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून महिलांना स्वतंत्रपणे (गैरमेहरम) म्हणजे कुटुंबीयातील पुरुषांशिवाय हज यात्रा करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी त्यांची संख्या जवळपास अकराशे होती. या वेळी त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असून, एकूण २३०० महिला एकट्या हज यात्रेत सहभागी होतील.