शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:01 IST

Chandrakant Khaire News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर एकनाथ शिंदे यांनीही सोबत यावे. म्हणजे मूळ शिवसेना पुन्हा तयार होईल, असे मत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले होते. याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे.

Chandrakant Khaire News: आगामी महापालिका, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दुसरीकडे याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की, मविआत सामील होणार, याबाबतच्या चर्चांनीही जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या एका विधानावर चंद्रकांत खैरे यांनी आक्षेप घेतला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांनी राज ठाकरेंना जवळ ठेवले पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर बाळासाहेबांना ती खरी श्रद्धांजली ठरेल. तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, तर शिवसेना भक्कम होईल. शत प्रतिशत स्वबळावर राज्य करण्याची इच्छा ज्यांना कुणाला झालेली आहे, त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नाही, जर हे तिघे एकत्र आले तर. पुन्हा ते वैभव मिळेल. एकत्र येऊन तर बघावे, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले होते. यावर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. 

एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला

एकनाथ शिंदे छे... ते कशाला पाहिजेत? त्यांनी उद्धव, आदित्य ठाकरे यांना त्रास दिला आहे. आम्हाला एकनिष्ठ असलेली व्यक्ती पाहिजे. गजानन कीर्तीकर हे तसे बोलले असतील कारण त्यांचा मुलगा आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना शिंदेंसोबत जाऊन पश्चात्ताप होत आहे, असा दावा खैरे यांनी केला. 

दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते दोघे मिळून महायुतीला धडा शिकवतील. दोन्ही बंधू एकत्र येतील म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येण्याच्या उकळ्या फुटत आहेत. एकनाथ शिंदे गटाची परिस्थिती काही दिवसांत वाईट होईल. शिवसेना फोडली याचे गजानन कीर्तिकर यांना वाईट वाटत आहे, असे खैरे म्हणाले.

 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना