शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चंद्रकांतदादांनी गायले कन्नड अभिमान गीत, ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’; सीमा भागात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:35 IST

सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

बेळगाव : सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्याची ध्वनीचित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होताच सीमाभागातून संताप व्यक्त होत आहे.बेळगावजवळील गोकाक तालुक्यातील तवग येथे शुक्रवारी सायंकाळी पाटील यांच्या हस्ते दुर्गादेवी मंदीर जीर्णोद्धाराचा शुभारंभ झाला. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. चंद्रकांतदादांनी कन्नडमधून ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचे गीत गायले. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.ते म्हणाले, गेली ६१ वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषक एकदिलाने राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता? सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.मराठी युवा मंच एकीकरण समितीने पाटील यांचा निषेध केला आहे. मराठीचा द्वेष करणाºयांच्या कार्यक्रमात जाऊन कन्नडमध्ये गीत गाण्याची कृती सीमाभागातील मराठी जनांच्या भावनांवर मीठ चोळणारी आहे, असे समितीने म्हटले आहे.भाजपाचे मराठी प्रेम बेगडी-चंद्रकांत पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावी. भाजपाचे मराठी प्रेम किती बेगडी आहे, हे या कृतीवरुन समजते. कर्नाटकनधील आगामी विधानसभा निवडणूक डोळ््यांसमोर ठेवत कन्नड लोकांना खूश करून मते मिळविण्याचा हा प्रयत्न आहे.- राजू पावले, एकीकरण समिती, येळ्ळूर विभागमहाराष्ट्रातील भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते. आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाºया मंत्री पाटील यांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी मराठी माणसाची माफी मागावी. - धनंजय मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलKarnatakकर्नाटक