शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मायनिंगसह धरणग्रस्तांच्या प्रश्नाचे आव्हान

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

प्रलंबित प्रश्न सोडविणे महत्त्वाचे : समस्या निराकरणाची नव्या सरकारकडून अपेक्षा

वैभव साळकर - दोडामार्ग -महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या भाजपच्या नव्या सरकारकडून दोडामार्ग तालुकावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तिलारी धरणग्रस्तांचा प्रश्न, तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, मायनिंग प्रश्न, रोजगाराच्या संधीची अनुपलब्धता, आरोग्याच्या समस्या, तालुका क्रीडांगणाचा विषय अशा विविध समस्यांनी येथील जनता त्रस्त आहे. या सर्व समस्या सोडविण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आणि भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी व नेतेमंडळींपुढे राहणार आहे. ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातीतून निवडणुकीपूर्वी विचारणा करीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील घोटाळे आणि विविध समस्या जनतेसमोर मांडणाऱ्या भाजपला राज्यातील जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला कौल दिला. त्यामुुळे आज केंद्रात सत्ता स्थापनेनंतर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असे जणू समीकरणच सध्या तयार झाले आहे. या नव्या भाजपा सरकारकडून दोडामार्ग तालुकावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. येथील तिलारी धरणग्रस्तांचा विषय असो किंवा मायनिंगचा हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी नवे सरकार कोणती पावले उचलते, याकडेच दोडामार्ग तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. रस्त्यांची दुरवस्थातालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे शोधणे कठीण बनले आहे. कोणत्याही भागाचा विकास हा तेथील रस्त्यांवरच अवलंबून असतो. त्यामुळे रस्त्यांची बिकट अवस्था सुधारण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आणि पर्यायाने पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे असणार आहे.तिलारी धरणग्रस्तांचा प्रश्न ऐरणीवरतालुक्यात सद्यस्थितीत तिलारी प्रकल्प पूर्ण झाला आहे. मात्र, ज्यांच्या त्यागावर प्रकल्प उभा आहे, त्या धरणग्रस्तांचे प्रश्न मात्र अद्याप मार्गी लागलेले नाहीत. धरणासाठी जमिनी संपादित करताना घरटी एक नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेकवेळा आंदोलने, उपोषणे करावी लागली. शासकीय नोकरी देणे शक्य नसल्याने प्रक ल्पग्रस्त दाखलाधारकास एकरकमी अनुदानाची रक्कम म्हणून पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. हा प्रश्न भाजप सरकार सोडवेल, अशी आशा धरणग्रस्त बाळगून आहेत. पर्यटन विकास व्हावा!पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर असलेल्या गोवा राज्याला लागून दोडामार्ग तालुका आहे. याठिकाणी पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. मांगेली धबधबा, फुकेरी हनुमंतगड, तिलारी धरण, कसईनाथ डोंगर आदी प्रमुख स्थळे आहेत. पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास तालुक्यात देशी-विदेशी पर्यटक येतील आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होईल. तालुक्यात क्रीडांगण नसल्याने क्रीडा क्षेत्रात येथील खेळाडूंची पिछेहाट थांबविण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मायनिंगसारखे प्रदूषणकारी प्रकल्प प्रास्तावित आहेत. या प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. असे असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात काही ठिकाणी मायनिंग सुरू झाले. याचा फटका पुढे निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांना बसला. आता भाजपचे नवे सरकार सत्तेत आहे. हे नवे सरकार मायनिंगबाबत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.आरोग्य व्यवस्थेची दैनातालुक्यातील लोकांना सध्या आरोग्याच्या समस्येने ग्रासले आहे. तालुक्यात केवळ एक दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमरतरता आहे. त्यामुळे उठसुठ गोव्याला जावे लागते.त्यात रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे राहणार आहे.