शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैशाचे बळ, समाज माध्यमांचा वाढता दुरुपयोग थांबविण्याचं आव्हान- सहारिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:58 IST

सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

ठाणे : सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. ते आज नवी मुंबई महापालिका येथील ज्ञान केंद्र सभागृहात आयोजित कोकण विभागीय कार्यशाळेस संबोधित करीत होते. कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका या विषयावर या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.निवडणूक आयुक्त सहारिया याप्रसंगी म्हणाले की, ७४ व्या घटना दुरुस्तीत संस्थानिक स्वराज्य संस्थाना संवैधानिक दर्जा देण्यात आला असून, दर ५ वर्षांनी निवडणुका घेतल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला असून, त्याला भारत निवडणूक आयोगासारखेच अधिकार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. प्रसंगी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक विषयक बाबींचे उल्लंघन केले तर आयोग कारवाई करू शकतो.मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्चमतदानाचे प्रमाण सर्वत्र कमी होत आहे, मात्र महाराष्ट्रात ते साधारणपणे स्थिर आढळते. महापालिका निवडणुकीत ५० ते ६० टक्के, जिल्हा परिषद निवडणुकीत ६० ते ७० टक्के, ग्रामपंचायत निवडणुकात ७० टक्के असे चित्र दिसते. विशेषत: उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अधिक शिकलेल्या मंडळींचा मतदानासाठी अनुत्साह ही चिंतेची बाब आहे, त्यांचे मतदान वाढले पाहिजे, असे सांगून निवडणूक आयुक्तांनी पैशाच्या बळाचा आणि समाज माध्यमांच्या वाढत्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मध्यंतरी गोखले इन्स्टिट्यूटकरवी आम्ही यावर अभ्यास करवून घेतला तेव्हा निदर्शनास आले की, पक्ष आणि उमेदवार नेमून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्च करतात.उमेदवारी अर्ज बिनचूक झालेराज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह हवे असेल तर नोंदणीची पद्धत सुरू केली, खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे, आश्वासनाचा जाहीरनामा तसेच केलेली कामे जनतेसमोर ठेवणे बंधनकारक केले आहे. नामनिर्देशन आणि शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्यक केले आहे, यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण १ टक्क्यावर आले, अशी माहिती सहारिया यांनी दिली.विद्यापीठाच्या पातळीवर जागरूकताविद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या वेळी मी मतदार नोंदणी केली नसल्यास ती करेन असे लिहून देणे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थाना भेटी देणे, याविषयीही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून तरुण पिढीत निवडणुका आणि मतदान याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अशीही माहिती त्यांनी दिली.प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ही कार्यशाळा घेण्यामागची भूमिका सांगितली. निवडणूक यंत्रणेचे बळकटीकरण करणे आणि लोकसहभाग वाढविणे यासाठी आयोग गांभीर्याने प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले. मतदार जागृतीसाठी पंधरवडाही पाळण्यात आल्याचे ते म्हणाले. एखाद्या चांगल्या गोष्टी घडत असतील तर श्रेयवाद उपस्थित करून अडथळे आणण्याचे कामही काही मंडळी करतात याचेही उदाहरण देऊन त्यांनी याकडे दुर्लक्ष करून निवडणूक विषयक यंत्रणा बळकट करावी असे आवाहन केले.यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी,  महापौर जयवंत सुतार, महानगरपालिका आयुक्त रामस्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Electionनिवडणूक