शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी संच विक्रीला कोर्टात आव्हान

By admin | Updated: June 18, 2017 00:21 IST

लोकमत’ला नव्याने मिळालेल्या कागदपत्रांनुसार महाजनकोने कोराडीचे चार निकामी संच ज्या लिलावात मातीमोल किमतीला विकले त्या लिलावाला सिव्हिल जज

- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लोकमत’ला नव्याने मिळालेल्या कागदपत्रांनुसार महाजनकोने कोराडीचे चार निकामी संच ज्या लिलावात मातीमोल किमतीला विकले त्या लिलावाला सिव्हिल जज (सिनिअर डिव्हिजन) यांच्या कोर्टात आव्हान दिले गेले आहे.ही याचिका पुण्याच्या सतीश सेठिया या बड्या ठेकेदाराने दाखल केली आहे व त्यात आॅनलाइन लिलाव रद्द करावा व केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत महाजनकोने सनविजय रिरोलिंग इंजिनीअरिंग वर्क्सला संच तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. ही याचिका ९ मार्च २०१७ रोजी दाखल झाली असून पुढील सुनावणी २९ जून रोजी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यावरील सुनावण्या सुरू असतानाच महाजनकोने संच क्र. १ तोडण्याची परवानगी सनविजय रिरोलिंगला २७ एप्रिल २०१७ रोजी दिली आहे. याचबरोबर महाजनकोने ११ जून २०१७ रोजी जो खुलासा ‘लोकमत’कडे पाठविला त्यात या केसचा उल्लेखच नाही, यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ झाले आहे. महाजनकोच्या १०० कोटी मालमत्ता व तेवढीच वार्षिक उलाढाल या पात्रता निकषाला आव्हान दिले आहे. शिवाय महाजनकोने जानेवारी २०१६मध्ये याच संचाचा लिलावाचा प्रयत्न केला असता सरकारी किंमत १२५ कोटी ठेवल्याचा उल्लेख करून १० महिन्यांनंतर हे संच ६०.६० कोटीत विकले याबद्दल संशय व्यक्त केला आहे व लिलाव रद्द करण्याची मागणी सेठिया यांनी आपल्या याचिकेत केली आहे. पुण्याहून ‘लोकमत’शी बोलताना सेठिया यांनी या सर्व मुद्द्यांचा पुनरुच्चार केला. २०१३मध्ये महाजनकोने परळीचे दोन संच विक्रीला काढले होते. त्या वेळी आम्ही २१.१४ कोटींची बोली लावली. ती नाकारून महाजनकोने हे संच फेरलिलावात १५.८० कोटीत विकले, अशी माहिती दिली. मुख्य जनसंपर्क अधिकारी महेश आफळे म्हणाले, ‘‘लोकमत’ला पाठविलेल्या खुलाशात अनवधानाने ही बाब नमूद करावयाची राहून गेली.’ मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी सांगितले की, कोर्टाने या प्रकरणात कुठलाही स्थगनादेश दिला नव्हता. ‘लोकमत’च्या वृत्ताला दुजोराया केसमुळे ‘लोकमत’च्या ‘महाजनको कोराडीचे चार संच मातीमोल किमतीत विकले गेले’ या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे़