शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये एलबीटी शुद्धिपत्रकाच्या अंमलबजावणीस याचिकेद्वारे आव्हान

By admin | Updated: July 23, 2016 05:15 IST

६ जुलै २०१३ रोजी जारी एलबीटी शुद्धिपत्रकावर त्याच दिवसापासून अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले

नागपूर : ६ जुलै २०१३ रोजी जारी एलबीटी शुद्धिपत्रकावर त्याच दिवसापासून अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. स्टील अ‍ॅन्ड हार्डवेअर चेंबर आॅफ विदर्भने यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी गुरुवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, नगरविकास विभागाचे उपसचिव व नागपूर महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.नागपूरमध्ये १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी नियम लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात २८ मार्च २०१३ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये कोणत्या मालावर किती एलबीटी लावण्यात येणार, हे जाहीर करण्यात आले होते. यानंतर ‘एलबीटी’ला व्यापाऱ्यांकडून जोरदार विरोध झाला. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. (प्रतिनिधी)>याचिकाकर्त्यांचे काय म्हणणे...शासनाने विशिष्ट मालावरील एलबीटी दरात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ६ जुलै २०१३ रोजी शुद्धिपत्रक जारी करण्यात आले.हे शुद्धिपत्रक पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल २०१३ पासून लागू होणे आवश्यक होते. परंतु, नगरविकास विभागाने तसे न करता शुद्धिपत्रक ६ जुलै २०१३ पासून लागू करण्याचे निर्देश दिले.हा निर्णय अवैध आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. हरनिश गढिया यांनी बाजू मांडली.