शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील २ हजार पुलांच्या स्ट्रक्चर आॅडिटचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:58 IST

२०१६ पासून विभागातील धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार पुलांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागासमोर निर्माण झाले आहे. मंत्रालयातून वारंवार आदेश देऊनही प्रादेशिक विभागाने स्ट्रक्चर आॅडिट केले नाही.शनिवारी सिल्लोड तालुक्यातील अंजना नदीवरील उपळी-पळशी या गावांना जोडणारा पूल पावसामुळे खचल्यानंतर जिल्ह्यासह मराठवाड्यातील पुलांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकाम विभागाने व जिल्हा परिषदेने बांधलेल्या पुलांचे आॅडिट आॅगस्ट २०१६ पासून रखडले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्व मिळून ३०० लहान-मोठे पूल आहेत. त्यानुसार मराठवाड्यात २ हजारांच्या आसपास पूल असण्याची शक्यता बांधकाम विभाग सूत्रांनी वर्तविली आहे. यामध्ये दगडी आणि अलीकडच्या काळात बांधलेल्या पुलांचा समावेश आहे. २०० ते १००० मीटरच्या अंतरातील पुलांच्या तपासणीचे अधिकार श्रेणीनिहाय अभियंत्यांवर देण्यात आलेले आहेत. ७६ तालुक्यांत बांधकाम विभागाचे सुमारे ६५ उपविभाग आहेत. विभागात किती पूल आहेत, याचा आकडा बांधकाम विभागाकडे नसून २ हजार पूल असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर मराठवाड्यातील पुलांचे आॅडिट करण्यात आले. मराठवाड्यात ८१ जुने पूल आढळून आले. परंतु त्या पुलांचे आॅडिट तांत्रिकदृष्ट्या अर्धवट राहिले. मनुष्यबळ नसल्यामुळे पूर्ण पुलांचे आॅडिट करणे शक्य नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.धोकादायक सहा पूलप्रभारी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, सिल्लोडमधील पूल जि.प.ने बांधलेला होता. विभागातील काही पूल एनएचएआयकडे वर्ग झाले आहेत. काही पुलांची कामे मंजूर झाली आहेत. जे पूल धोकादायक आहेत, त्यांचे स्ट्रक्चर आॅडिट केले आहे. असे ६ पूल असून, त्यांचे काम लवकरच सुरू होईल.