शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विखे यांच्या निवडीला आव्हान

By admin | Updated: March 31, 2017 03:51 IST

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या निवडीला

अहमदनगर : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या निवडीला त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले आहे. पदाधिकारी निवडीला आव्हान देतानाच नवनिर्वाचित विश्वस्तांच्या कारभाराला स्थगिती मिळण्यासाठीचा अर्जही त्यांनी दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणात सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने राधाकृष्ण विखे व इतर दोन विश्वस्तांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. राधाकृष्ण विखे यांची गत महिन्यात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीस त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी हरकत घेतली आहे. ही निवड बेकायदेशीर असल्याचा त्यांचा आरोप आहे. नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दबावाखाली येऊन विश्वस्तांनी दाखल केलेल्या चेंज रिपोर्टला तत्काळ मान्यता दिली. मात्र, त्याचवेळी आपण अडीच वर्षापूर्वी दाखल केलेल्या चेंज रिपोर्टवर निर्णय घेतला गेला नाही, असे अशोक विखे यांचे म्हणणे आहे. या अपिलावर १२ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. नवीन विश्वस्तांच्या कामकाजाला स्थगिती मिळावी यासाठीचा अर्जही अशोक विखे यांनी दाखल केला आहे. त्यावरही १२ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात राधाकृष्ण विखे यांसह अण्णासाहेब म्हस्के व आबासाहेब खर्डे यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)