शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नोटांवरील बंदीला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 06:27 IST

पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देत, दोन ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई : पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देत, दोन ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्र सरकारने अत्यंत घाईने निर्णय घेऊन सामान्यांची प्रचंड गैरसोय केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.अ‍ॅड. जमशेद मिस्त्री व अ‍ॅड. जब्बार सिंग यांनी दिवाळी सुटीकालीन खंडपीठापुढे याचिका दाखल केली. त्यात अनेक प्रश्न उपस्थित होणार असल्याने, ही याचिका नियमित खंडपीठापुढे सादर करण्यात यावी, असे निर्देश न्या. एम. एस. कर्णिक यांनी याचिकाकर्त्यांना दिले.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) २ नोव्हेंबरला अधिसूचना काढून सर्व राष्ट्रीयकृत बँकांना त्यांच्या एटीएममध्ये भरण्यात येणाऱ्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम १०० रुपयांच्या नोटांनी भरण्यात यावी, असा आदेश पारित केला. हे केवळ प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असल्याचेही आरबीआयने अधिसूचनेत नमूद केले आहे. मात्र, त्यानंतरही ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याची सरकारने घाई केली. कायद्यानुसार, सरकारला यासाठी वटहुकूम जारी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, त्याची अंमलबजावणी करायला हवी होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. मिस्त्री यांनी केला. १९७८ मध्ये आणीबाणीच्या काळात ‘द हाय डिनॉमिनेशन बँक नोट्स अ‍ॅक्ट, १९७८’ कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यांतर्गत नोटा व्यवहारातून रद्द करण्यापूर्वी सरकारने वटहुकूम काढणे बंधनकारक आहे. सरकारला वटहुकूम काढायचा नव्हता, तर त्यांनी आधी कायद्यात सुधारणा करायला हवी होती, असेही मिस्त्री यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)