शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांप्रदायिक विचारांचे आव्हान सर्वांत मोठे

By admin | Updated: August 22, 2016 00:45 IST

देशात सर्वात मोठे आव्हान हे सांप्रदायिक विचारांचे आहे. या विचारांचा आग्रह धरीत निरपराध लोकांची हत्या करणे ही चिंताजनक बाब आहे.

पुणे : देशात सर्वात मोठे आव्हान हे सांप्रदायिक विचारांचे आहे. या विचारांचा आग्रह धरीत निरपराध लोकांची हत्या करणे ही चिंताजनक बाब आहे. भारतात गाईचा आदर सर्वजण करतात. आम्ही गाईच्या आधी आईचा सन्मान करतो. गायीला आई म्हणत नसाल तर येथे राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणण्याचा अधिकार मुळातच मुख्यमंत्र्यांना कुणी दिला, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर येथे केला. ‘पुण्यभूषण फाउंडेशन’ (त्रिदल, पुणे) यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना जेडीयूचे अध्यक्ष (जनता दल युनायटेड) खासदार शरद यादव यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरित असलेल्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणेरी पगडीची परंपरा बाजूला ठेवत फुले पगडीने वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शंकर बुरुंगले, बाबूराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, दत्ता गांधी या स्वातंत्र्यसैनिकांना गौरविण्यात आले. या प्रसंगी महापौर प्रशांत जगताप, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.‘गायीला आई म्हणत नसाल तर, तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही,’ असे वक्तव्य खट्टर यांनी मध्यंतरी केले होते, तोच धागा पकडत पवार यांनी स्वयंघोषित गोरक्षकांवर शरसंधान साधले. जमातवादाचे आव्हान फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नसून धर्मासाठी कायदा हातात घेवून हत्या केल्या जात आहेत. गायीला आई म्हणण्याची सक्ती करणे, ही चिंताजनक परिस्थिती आहे. सावरकरांनी गायीला आई न म्हणता उपयुक्त पशू म्हटले तसेच काळाराम मंदिरात दलित व्यक्तीची पूजारी म्हणून नियुक्ती केली. सावरकरांची ही भूमिका न सांगता त्यांना हिंदुत्त्ववादी म्हणून पुढे केले जाते, अशा शब्दांत त्यांनी हिंदू रक्षकांचा खोटेपणा उघड केला.यादव म्हणाले, देशाची प्रगती झाली आहे, पण हल्ली सत्य बोलण्यावर बंदी आली आहे. देशातील कट्टरता वाढली असून सत्य बोलणे कठीण झाले आहे. सत्य बोलाल तर दाभोलकर, कलबुर्गींप्रमाणे हत्या केली जाते. लोकांच्या भावना लगेच दुखावल्या जातात. चांगली व्यक्ती घडणे, न्यायासाठी लढणे म्हणजे समाजवाद होय.पुरस्काराचे फॅड आले असून हल्ली पुण्यामध्ये फार पुरस्कार दिले जातात. थोरल्या बाजीरावांच्या नावाने पुरस्कार देण्याला माझा आक्षेप नाही, पण दुसऱ्या बाजीरावापर्यंत पुरस्कार येऊ देऊ नका. पाऊस-पाणी चांगले म्हणून पीक येते, पण पुरस्काराचे पीक नको, अशी उपरोधिक टिप्पणी पवार यांनी केली. >जगासमोर इसिसच्या रूपाने जमातवादाचे आव्हान उभे राहिले आहे. आपल्या देशातही धर्माधिष्ठित भूमिका मांडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या दृष्टीने हे राजकारण अत्यंत घातक आहे. जागतिकीकरणाचे परिणाम जाणवू लागल्याने समाजवादाची किरणे दिसू लागली आहेत, अशी भावना भाई वैद्य यांनी व्यक्त केली.