शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आव्हान आपत्तींचे

By admin | Updated: July 20, 2014 02:41 IST

हल्ली ‘डिङॉस्टर मॅनेजमेंट’ हा शब्द अनेकांच्या तोंडी असतो. भूकंप,त्सुनामी, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींना मानवी बुध्दीमत्तेच्या आधारे यशस्वी तोंड देण्याचे आव्हान आपण पेलतो आहोत.

- शैलेश माळोदे
हल्ली ‘डिङॉस्टर मॅनेजमेंट’ हा शब्द अनेकांच्या तोंडी असतो. भूकंप,त्सुनामी, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींना मानवी बुध्दीमत्तेच्या आधारे यशस्वी तोंड देण्याचे आव्हान आपण पेलतो आहोत. परंतु त्याला तंत्रज्ञानाची मोठी साथ हवी आहे. आपत्तीच्या काळात संपत्ती आणि जीवितहानी याची कमीतकमी हानी व्हायला हवी, त्यातच नियोजनाचे यश अवलंबून आहे. आपत्ती नियोजनाचा हा माहितीपूर्ण फेरफटका.
 
कोणतीही आपत्ती किंवा विपदा सांगून येत नाही. त्यामुळे त्या विपदेला किंवा आपत्तीस तोंड देण्यासाठी सदैव तत्पर राहणं महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणो एखादी कौटुंबिक आपत्ती अचानक उद्भवू शकते त्याचप्रमाणो एखादी नैसर्गिक आपत्ती़ आणि हो, युक्रेनमधील विमान पाडण्याच्या घटनेसारखी मानवनिर्मित कृत्रिम आपत्ती अगदी अचानक उद्भवू शकते, त्या वेळी तिला तोंड द्यायचं कसं, या प्रश्नापेक्षा हल्ली तिचं व्यवस्थापन करायचं कसं, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरू लागलाय. त्यासाठी आपल्या स्थानिक किंवा अगदी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धडय़ाप्रमाणोच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाठ आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यांच्या अनुभवातून, चांगल्या प्रॅक्टिसमधून आपण शिकायलाच हवं.
 
अनुभवातून काही शिकणार का?
पृथ्वी हा एक जिवंत ग्रह आहे.  पृथ्वीदेखील जेम्स लव्हलॉक या शास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार सजीव आहे. यामध्ये हालचाली मोठय़ा प्रमाणात होत असतात. या हालचाली भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी इ. आपल्याला विपदा अथवा आपत्ती वाटत असल्या तरी असतात मात्र नैसर्गिक हालचाली. त्यांना तोंड देण्याची तयारी नेहमी ठेवणंच महत्त्वाचं. जपान आपल्या भूकंपप्रलय भूमीला समजून घेत या दृष्टीनं अशी योजना तयार केलीय, की ज्यायोगे सर्व नागरिक यासाठी तयार असतात. त्यांच्यामध्ये भूकंप आल्यास काय करावं, यासाठी सर्व तयारीचं प्रशिक्षण असतं. आपत्कालीन व्यवस्थापन प्रामुख्यानं तीन पातळय़ांवर करण्यात आलंय. भूकंप येईल असं गृहीत धरून घरांची रचना शक्यतो कमीत कमी आर्थिक आणि मनुष्यबळ नुकसान होईल, अशी करण्यात आली आहे. त्यासाठी भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरण्यात येते. त्यानंतर भूकंप आल्यावर काय करावं याची माहिती नागरिकांना देण्यात आलीय. 
म्हणून भूकंपाचे धक्के बसले तरी लोकांनी टेबलखाली आसरा घ्यावा किंवा विशेष बंकर्समध्ये आo्रय घ्यावा, असं सांगण्यात आलंय. त्यानंतर येतो पुनर्वसनाचा भाग. त्यानुसार मग विमा आणि पुनर्बाधणी यासारखी उपाययोजना करण्यात येते. जपान हा देश त्सुनामीसाठी देखील तयार देश आहे. तिथे याची पूर्वसूचना देणारी अत्याधुनिक यंत्रणा आहे. भारताने देखील आग्नेय आशियाई देशांबरोबर यादृष्टीनं करार केलाय. त्यामुळे हल्ली याची पूर्वसूचना मिळणं शक्य झालंय. हवामानाचा अंदाज योग्यप्रकारे अचूक रितीनं व्यक्त करण्याचं तंत्रज्ञान वापरून आइसलंड आणि इतर नॉर्दिक देशांतील आपत्कालीन व्यवस्थापन तंत्रद्वारे स्वत:च्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केलीय. या देशांमध्ये हिमकडे कोसळण्याचा धोका जास्त असतो. पॅसिफिक आयलंड्स किंवा पॅसिफिक बेटावर ज्वालामुखीप्रवणतेचा धोका जास्त असतो. आजकाल ज्वालामुखीची वेळ ब:यापैकी सांगणो शक्य आहे. वर्षात बरेचदा याबाबत निश्चितपणो सांगणो कठीण असतं. त्यामुळे या विषयावर लोकांना माहिती देण्यासाठी बिलबोर्ड्सचा देखील वापर करण्यात येतो.
जगामध्ये अमेरिकेची आपत्कालीन व्यवस्थापनप्रणाली सर्वात प्रगत आणि योग्य निधीची उपलब्धता असलेली आहे. त्याचद्वारे करण्यात येणारा उपकरणांचा वापर, देण्यात येणारे प्रशिक्षण आणि या काळात असलेल्या प्रॅक्टिशनर्सद्वारे केला जाणारा व्यायाम आणि चाचणी अतुलनीय आहे. आजकाल आपत्ती व्यवस्थापनात स्थानिक प्रशासनाची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरत आहे. पूर्वी हे काम केवळ व्यावसायिक किंवा सशस्त्र दलातील लोक करीत. परंतु अमेरिकेत हल्ली आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कामात वैविध्यपूर्ण करिअर्स आणि विभिन्न विषयांत तज्ञता असलेले लोक सहभागी होत आहेत. त्यामध्ये बिझनेस, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय निवास इत्यादी विषयांतले तज्ज्ञ सहभागी होत आहेत. तिथल्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिटय़ूट फॉर क्रायसिस, डिझास्टर अॅन्ड रिस्क मॅनेजमेंटने या सर्व फॅकल्टीजच्या विद्याथ्र्याना एकत्र अभ्यास करण्याची संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम चालविला आहे. 
भारतामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाचे खास शिक्षण देणा:या विद्यापीठ अथवा संस्थांची आणि अभ्यासक्रमांची वानवा आहे. अमेरिकेनं कतरिनाच्या वादळी अनुभवानंतर आपले अभ्यासक्रम अधिक सयुक्तिक बनवले आहेत. हवामान बदल आणि त्याचबरोबर वल्र्ड ट्रेड सेंटरवरील अतिरेकी हल्ल्यानंतरच्या स्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी उचित बदल केले आहेत. प्रसारमाध्यमं, विविध वैज्ञानिक विभाग, स्वयंसेवी संस्था, सशस्त्र दल, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांना एकत्र करून प्रशिक्षणाबरोबरच विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय यादृष्टीनं भारतात बरंच काही करण्यासारखं आहे. याबाबत कानाडोळा करणं वा अनास्था बाळगणं आल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या, वातावरणीय आणि आपत्तीय वैविध्य असणा:या देशाला परवडणारं नाही. तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय धडय़ांपासून शिकत आपत्कालीन व्यवस्थापनातून सुधारणा करणं महत्त्वाचं आहे. पावसाळा सुरू होताना यादृष्टीनं प्रयत्न तर अधिकच महत्त्वाचे ठरतात. 
(लेखक विज्ञान पत्रकार आहेत.)