शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीचा ठोका अखेर अकराला!

By admin | Updated: June 6, 2014 00:53 IST

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) अखेर गुरुवारी रात्री उशिरा ११ वाजता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला.

एमएचटी-सीईटीचे निकाल जाहीर : राज्यात ७ हजार ५0६ विद्यार्थी पात्र नागपूर :  वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) अखेर गुरुवारी रात्री उशिरा ११ वाजता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी  घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला.  हा निकाल नेमका किती वाजता जाहीर होईल, याबाबत दिवसभर विद्यार्थी व  पालकांमध्ये उत्सुकता होती. आधी दुपारी २ वाजता, नंतर ४ वाजता निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात येत होते.  शेवटी रात्री ११ चा ठोका पडला  अन् सीईटीचा निकाल जाहीर झाला. डीएमईआरने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निकालानुसार मेडिकल व डेन्टल अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील ७ हजार ५0६ विद्यार्थी पात्र  ठरले आहेत. यासाठी डीएमईआरने गत ८ मे रोजी राज्यभरात सीईटीची परीक्षा घेतली होती. यामध्ये नागपूर विभागातील १४ हजार ३0२ विद्यार्थ्यांंनी  परीक्षा दिली होती. राज्यातील ३९0 परीक्षा केंद्रांवर १ लाख ४८ हजार ३९७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यामध्ये ६५ हजार ६0७ मुले आणि ८२  हजार ७८७ मुलींनी परीक्षा दिली होती. यापैकी मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून ४ हजार १११ आणि राखीव कोट्यातून ३ हजार  ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुढील प्रवेशासाठी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात विद्यार्थ्यांंकडून चार केंद्रांवर प्राधान्य अर्ज भरून  घेण्यात येणार आहेत. ग्रँट मेडिकल महाविद्यालय  मुंबई, बी.जे.मेडिकल महाविद्यालय पुणे,  गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालय नागपूर आणि गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालय औरंगाबाद या केंद्रांवर  विद्यार्थ्यांंचे प्राधान्य अर्ज भरून घेतले जाईल. याबाबतचे परिपत्रक संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेला बसलेल्या  विद्यार्थ्यांंना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी ६ ते ९ जूनपर्यंंत विभागीय अधिकार्‍यांकडे अर्ज करावा, असेही आवाहन केले आहे.  यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १0 जून रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. तसेच ११ जूनपासून विद्यार्थ्यांंंना त्यांची गुणपत्रिका  संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.