शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

बोलक्या अर्धवटरावांची सेंच्युरी!

By admin | Updated: September 21, 2016 02:34 IST

जादूगार असणाऱ्या माझ्या वडिलांनी म्हणजे यशवंत पाध्ये यांची ही देणगी आहे.

मुंबई : जादूगार असणाऱ्या माझ्या वडिलांनी म्हणजे यशवंत पाध्ये यांची ही देणगी आहे. वडील अनेक ठिकाणी जादूचे प्रयोग करीत. त्या वेळी जादूच्या प्रयोगातच त्यांनी शब्दभ्रमाचा खेळ दाखविण्याचे सुरू केले. त्यांनी कागदावरच १९१६ साली एका बाहुल्याचे पात्र प्रथम साकारले. त्याप्रसंगी, अर्धवटरावाचा जन्म झाला, असे सांगत जगप्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी मंगळवारी ‘अर्धवटराव’ या बोलक्या बाहुल्याच्या शंभरीनिमित्त हा प्रवास उलगडला. मंगळवारी प्रभादेवी येथे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव : शंभरी करू जगभर साजरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी, अ‍ॅडगुरू भरत दाभोळकर, रामदास पाध्ये यांच्या पत्नी अर्पणा पाध्ये, मुलगा परीक्षित पाध्ये, सत्यजीत पाध्ये आणि सून ऋजुता पाध्ये उपस्थित होते. याप्रसंगी, ‘अर्धवटराव’ या बोलक्या बाहुल्याचा १००वा वाढदिवस त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसह धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, याप्रसंगी अर्धवटराव यांनी वाढदिवसाचा केक कापून उपस्थितांसोबत आनंद साजरा केला. या वेळी, ‘अर्धवटराव’ याचा शतकी प्रवास उलगडणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव’ यांच्यासोबतचे नाते उलगडताना अनेक वर्षांच्या रंगतदार आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘अर्धवटराव’ हे पाध्ये कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याशी असलेले नाते घट्ट आणि तितकेच संवेदनशील आहे. ‘अर्धवटरावां’च्या शंभरीनिमित्त ‘कॅरी आॅन एंटरटेन्मेंट - रामदास पाध्ये लाइव्ह’ हा नवा विशेष कार्यक्रम घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहोत.या वेळी पाध्ये यांच्या पत्नी अर्पणा यांनीही ‘अर्धवटराव - आवडा’ या जोडीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. त्या म्हणाल्या, अर्धवटराव हे पाध्ये कुटुंबीयांचा अविभाज्य भाग आहेत. त्यांनी चढउतारात पाध्ये कुटुंबीयांना बळ दिले. त्यांचा शंभर वर्षांचा प्रवास उत्तरोत्तर वाढत जावो, अशी आशा व्यक्त करते. (प्रतिनिधी)>१९१६ साली कागदावर एका पात्राच्या रूपात अर्धवटरावांचा जन्म झाला.मंगळवारी या अर्धवटरावांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली.‘अर्धवटराव : शंभरी करू जगभर साजरी’ या कार्यक्रमातून साजरा करण्यात आला वाढदिवस.