शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:29 IST

मुंबईसह पुणे, नागपूर, गोंदिया, सोलापूरसाठी विशेष सेवा

मुंबई /पुणे : मध्य रेल्वेने ९ ऑक्टोबरपासून मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया व सोलापूर या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण क्षमतेने पण फक्त आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येईल.मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई, मुंबई-पुणे) सिद्धेश्वर एक्स्प्रेस (मुंबई-सोलापूर), मुंबई-गोंदिया अशा गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सर्व गाड्यांच्या वेळा व क्रमांक पूर्वीप्रमाणेच आहेत. फक्त लक्षात येण्यासाठी म्हणून प्रत्येक क्रमाकांच्या आधी शून्य लिहिला आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. ‘मुंबई-नागपूर दुरांतो विशेष’ १० आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. तर दुरांतो विशेष ट्रेन ९ आॅक्टोबरपासून नागपूर येथून सुटणार आहे. दोन्ही गाड्या इगतपुरी वगळता 

नियमित थांब्यावर थांबतील. मुंबई-पुणे सुपरफास्ट विशेष ९ आॅक्टोबरपासून तर पुण्यावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल मुंबई-गोंदिया सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. गोंदियावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. इगतपुरी वगळता नियमित गाडीच्या थांब्यात आणि वेळेत बदल नसेल.मुंबई-सोलापूर सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसºया दिवशी सोलापूरला पोहोचेल. सोलापूरवरून सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसºया दिवशी पोहोचेल. तर, कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवन हे थांबा वगळता इतर थांब्यांवर थांबले.

थर्मल तपासणी करणारगाड्यांमध्ये प्रवासी बसण्याआधी त्याची थर्मल तपासणी केली जाईल. आॅक्सिजन लेवलही पाहिली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक आहे. दरम्यान, सरकार पुणे लोणावळा ही लोकल सेवाही १२ आॅक्टोबरपासून सुरू करत आहे. मात्र, यातून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल. यासाठी क्यूआर कोडचा वापर करणार आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

रेस्टॉरंट, बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरूमुंबई : राज्यातील रेस्टॉरंट, बार रोज सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असेल, असे परिपत्रक राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाने काढले आहे. हा नियम कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, हॉटेल, रिसॉर्ट, क्लबनाही लागू राहील. राज्यातील रेस्टॉरंट, बार५ आॅक्टोबरपासून उपस्थितीचे बंधन घालून सुरू करण्यात आले होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे