शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 07:51 IST

मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद ...

ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे.तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद आहे.  सीएसटी ते कल्याण रेल्वे वाहतूक 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिराने सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाला. याचा परिणाम काही प्रमाणात रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवाही पूर्वपदावर आली. पण आता पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान,टिटवाळा-सीएसटी लोकल सुरु झाल्याची माहिती मिळते आहे तसंच कसारा-आसनगाव मार्गावरही रेल्वे सुरु झाली आहे. पण टिटवाळा ते आसनगाव लोकल गेल्या 49 तासांपासून बंदच आहे.

मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर, सखल भागासह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा बुधवारी दुपारपर्यंत झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली आणि पाण्याचा निचरा पूर्णत: झाल्याने काही अंशी का होईना, मुंबईकरांना दिलासा मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता, बहुतांश कार्यालयांना सुटी असल्याने, मुंबईकर अत्यंत कमी संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे लोकल सेवा कोलमडलेली असली, तरी लोकांचे हाल मात्र झाले नाहीत.मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक ठिकाणी पडलेल्या सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. परिणामी, मंगळवार वगळता नेहमीप्रमाणेच हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती.

‘कोसळधारे’त २१ जणांचे बळी तर ४० हून जास्त जखमीअभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत दोन बालकांसह १२ जणांच्या अंगावर भिंत कोसळून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाले आहेत, तर ४०हून अधिक जण जखमी आहेत.ठाणे जिल्ह्यात ४ जण बुडाले तर चौघे बेपत्ता आहेत. पालघर जिल्ह्यात पाच जण बुडून मृत झाल्याने पावसाच्या बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे.या दुर्घटनेत मृत्यू व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून, अनेक जण बेपत्ता असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे.