शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने 'मर्दानगी' दाखवत पाकला धडा शिकवावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: August 25, 2014 11:10 IST

गेल्या महिनाभरात २५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला केंद्र सरकारने मर्दानगी दाखवत धडा शिकवावा असे विधान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - गेल्या महिनाभरात २५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला केंद्र सरकारने मर्दानगी दाखवत धडा शिकवावा असे विधान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पाकिस्तानसोबत फक्त चर्चा थांबवून उपयोग नसून पाकला त्यांच्या हद्दीत घुसून ठोकून काढले पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी पाकविरोधात कठोर भूमिका घ्या अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. पाक सैन्याने भारताच्या १३ गावांवर हल्ला केला. यात दोन नागरिक मृत्यूमुखी पडले. तर अनेक जण जखमी झाले. सीमेवरील १३ हजार नागरिक स्थलांतर करत असून भारतासाठी ही चिंतेची बाब असल्याचे उद्धव ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. २००३ नंतर प्रथमच पाकने ऐवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मात्र आपण विझलेल्या फटाक्यासारखे थंड कसे असा चिमटाही त्यांनी मोदी सरकारला काढला आहे. काँग्रेसची सरकार असताना अशी घटना घडली असती तर आपण सर्व त्यांच्यावर तुटून पडलो असतो. आता जनतेलाही तुमच्याकडून ठोस कृतीची अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारलाउद्देशून म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे पाकचा आचरटपणा सहन करणारे नेते नसल्याने त्यांनी दिल्ली मर्दांचे सरकार आले आहे हे जनतेला दाखवून द्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले.