मुंबई : भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून गोडसे समर्थकांमधून गोडसेचे मंदिर उभारण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप मुंबई सर्वोदय मंडळाने केला आहे. शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात चर्चासत्राचे आयोजन केले होते. केंद्राने याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. राम पुनियानी व पत्रकार हेमंत देसाई हे वक्ते होते तर अध्यक्षस्थानी विचारवंत अब्दुल कादर मुकादम हे होते.