शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण आरोग्यासाठी केंद्राचा ३६६ कोटींचा डोस

By admin | Updated: October 23, 2015 02:08 IST

संपुआ सरकारने पालघर येथून सुरू केलेल्या देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी २०१५-१६करिता केंद्र सरकारने आपल्या ७५ टक्क्यांच्या हिश्श्यातून

- नारायण जाधव ,  ठाणेसंपुआ सरकारने पालघर येथून सुरू केलेल्या देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी २०१५-१६करिता केंद्र सरकारने आपल्या ७५ टक्क्यांच्या हिश्श्यातून ३९६ कोटी ४५ लाखांचा पहिला हप्ता महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यातून राज्य आरोग्य सोसायटी विविध आरोग्यविषयक सुधारणा करून राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करणार आहे. विविध लसीकरण मोहिमा, आयोडिन कार्यक्रम, पल्स पोलिओ मोहीम, ग्रामीण कुटीर रुग्णालयांत सुधारणा, नवीन आरोग्य केंद्रांची बांधणी, त्यात डॉक्टर्स, नर्ससह इतर रिक्त पदांची भरती करून अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यावर ही रक्कम खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.केंद्र सरकारने २०१४-१५मध्ये सर्व केंद्र पुरस्कृत आरोग्य योजना एकत्रित करून त्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान हे नाव दिले. त्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश केला. यातील ग्रामीण अभियानासाठी आपल्या हिश्श्याच्या ७५ टक्के अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ही रक्कम दिली आहे.राज्यात आजघडीला ग्रामीण आरोग्य सेवेत अनेक उणिवा आहेत. लोकसंख्येच्या मानाने अद्यापही राज्याची आरोग्य सेवा अनेक आघाड्यांवर तोकडी असल्याचे केंद्र शासनाची आकडेवारी सांगते. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यास भरपूर वाव असून, त्यासाठीच हे ३९६ कोटी ४५ लाख रुपये वापरले जाणार आहेत.केंद्राच्या आकडेवारीनुसार, राज्यात आजघडीला २८३० आरोग्य उपकेंद्रे, ३७८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८४ कम्युनिटी हेल्थ सेंटर, ३९१५ पुरुष हेल्थ वर्कर, १८३ स्त्रीरोगतज्ज्ञ, १८३ बालरोगतज्ज्ञ, ९३८ विशेष तज्ज्ञ, २७८ क्ष-किरणतज्ज्ञ, ८९८ प्रयोगशाळातज्ज्ञांची कमतरता आहे. याशिवाय, अनेक कुटीर रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, अनेक प्रकारची यंत्रे उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी ती असली तरी चालविण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. यामुळे ग्रामीण आरोग्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. तो सावरण्यासाठी या अनुदानाचा मोठा फायदा होणार आहे.खर्च करण्यात येणारी रक्कम 190.9 कोटी रु. कुटीर रुग्णालयांत सुधारणा10.27 कोटी रु. दैनंदिन लसीकरण कार्यक्रम16.94 कोटी रु. पल्स पोलिओ लसीकरण32 लाखराष्ट्रीय आयोडिन कार्यक्रम160.95 कोटी रु.आरोग्य केंद्रांत सोयीसुविधा17.88 कोटी रु. आरोग्य केंद्रांची बांधणी396.45 कोटी रुपये एकूण रक्कम