शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा वाढता कहर; मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:01 IST

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील कोरोरा रुग्णांचा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रासोबतच आणखी काही राज्यांमध्येही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यांना कोरोना संकट रोखण्यास मदत होणार आहे. (CoronaVirus in India)सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण खुले होणार? सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये केंद्रानं उच्च स्तरीय पथकं पाठवली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रदेखील लिहिलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेशदेखील  केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत. ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेयदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ७४२ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी साडे ६ हजार २१८  रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. काल देशात कोरोनामुळे १०४ जणांचा मृत्यू झाला. त्यातले ५१ जण महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळेच केंद्रानं महाराष्ट्रात उच्च स्तरीय पथक पाठवलं आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्येही पथकं रवाना करण्यात आली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या