शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’

By admin | Updated: August 7, 2014 00:58 IST

पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

कल्याण : ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’ या पुस्तकाचे लेखक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी जिल्हा तदर्थ न्यायाधीश एम.एच. मोरे यांच्या न्यायालयात या दाव्यावरील अपिलाची सुनावणी झाली.
खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकात त्यांनी ब्राrाणांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक किशोर कडू यांच्याविरोधात कल्याणातील अॅड. प्रकाश दाबके यांनी कल्याण न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय 5 वे या ठिकाणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याने खेडेकरांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 
परंतु, खेडेकरांनी मूळ प्रकरणाविरोधात जिल्हा तदर्थ न्यायाधीश मोरे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपील अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. 
यात न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना संबंधित प्रकरण संवेदनशील असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे प्रत्येक तारखेला अर्जदाराला उपस्थित राहण्यासंदर्भात बंधन घालू नये, असे नमूद केल्याची माहिती खेडेकरांचे वकील अॅड. गणोश घोलप यांनी दिली. 
सुनावणी दरम्यान मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकत्र्यानी न्यायालयाच्या आवारात मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)