शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 05:35 IST

आता खा. प्रीतम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहेत. आता जनगणना होणार असून सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.

औरंगाबाद : राष्ट्रीय जनगणना होत असताना ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. जातीनिहाय जनगणना झाल्यास चित्र स्पष्ट होऊन संबंधित समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

एका खासगी कार्यक्रमासाठी पंकजा शहरात आल्या होत्या. सोबत खा. डॉ. प्रीतम मुंडे होत्या. जालना येथील ओबीसी मोर्चात सहभागी नसल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, उपस्थित नसले तरी त्या चळवळीचा गेल्या अनेक वर्षांपासून मी भाग आहे. ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, ही मागणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत केली होती. आता खा. प्रीतम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहेत. आता जनगणना होणार असून सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.

ओबीसी मोर्चात ‘आता मुख्यमंत्री ओबीसी’ असे बॅनर झळकले. ओबीसी म्हणून आपण या पदावर योग्य आहात, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना पंकजा म्हणाल्या, त्याला सहा वर्षे झाली आहेत. तो विषय मागे पडला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागील सरकारने व्यवस्थित हाताळला. सध्या समाजाची निराशा झाली असून ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका आहे.

‘त्या’ प्रकरणाचे राजकीय भांडवल नाहीसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात विचारले असता पंकजा म्हणाल्या, तो विषय आता मागे पडला असून नैतिक, कायदेशीरदृष्ट्या त्या गोष्टींचे समर्थन मी करीत नाही. परंतु, हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. पण अशा प्रकारामुळे एखादे कुटुंब, त्या कुटुंबातील दोष नसलेल्यांना त्रास होतो. एक महिला म्हणून याकडे संवेदनशीलतेने पाहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेOBCअन्य मागासवर्गीय जाती