शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

सेन्सॉर बोर्डाविरुद्ध लढा द्यावाच लागेल!

By admin | Updated: March 23, 2017 03:31 IST

दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला.

पुणे : दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला. प्रत्येक पिढीला स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागेल, असे परखड मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केले.डिजिटल युगात चित्रपटाचा आशय विविध माध्यमांतून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्डचे अस्तित्व काहीसे कमी झाले आहे. मात्र, स्वत:च्या चित्रपटांबाबत वैयक्तिक पातळीवर संवेदनशीलता जोपासण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘लोकमत माध्यम समूहा’तर्फे एनईसीसी, युनिसेफ आणि यूएन वुमेन यांच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समीट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘रोल आॅफ द लाइन्स’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, दिव्या दत्ता, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा आदी परिसंवादात सहभागी झाले होते.१९८४ मध्ये शबाना आझमी यांच्यासमवेत केलेला ‘अर्थ’ ते २०१७ चा विद्या बालनचा ‘बेगमजान’ हा खूप मोठा प्रवास आहे. ‘उडता पंजाब’च्या पार्श्वभूमीवर ‘बेगमजान’ला सेन्सॉर बोर्डकडून काय कात्री लावली जाईल, याची धाकधूक होती. मात्र, केवळ दोन साधे बदल सुचविण्यात आले, असे त्यांनी सांगितले. विद्या बालन म्हणाली, मी आजवर अनेक भूमिका केल्या; मात्र ‘बेगमजान’मधील भूमिका पेलली आणि जगलीही. महिलांनी आयुष्यात थोडीशी बंडखोरी दाखवायलाच हवी. मनात अनेकदा संताप साठलेला असतो. माझ्या बाबतीतही ‘बेगमजान’ चित्रपट करताना असेच घडले. यातील अनेक संवाद जणू मलाच म्हणायचे आहेत, असे वाटत होते. ‘बेगमजान’च्या संवादांमध्ये क्रौर्य आहे, राग आहे; परंतु तिच्या भावना खऱ्याखुऱ्या आहेत. त्यामुळे हे संवाद म्हणताना अवघडल्यासारखे झाले नाही. (प्रतिनिधी)

महिलांनी ठाम भूमिका घ्यावी - विद्या-महिला ‘नॅचरल गिव्हर्स’ आहेत. त्या नेहमी इतरांचा विचार करतात; पण मला काय वाटते, याचा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही. स्वत:च्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट करायची असेल, तर समाज काय म्हणेल? लोक काय विचार करतील, असे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतात. मात्र, महिलांनी स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडण्याची भूमिका घ्यायला हवी, असे मत अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केले.