शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:04 IST

सेलिब्रिटींचं विश्‍व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची लोकांना इच्छा असते. त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक बाबीची माहिती लोकांना हवी असते. हे सारं अनुभवण्याची संधी ‘लोकमत’ आयोजित पहिल्यावहिल्या ‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात लोकांना मिळाली होती.

ठळक मुद्दे‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स!

सेलिब्रिटींचं विश्‍व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची लोकांना इच्छा असते. त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक बाबीची माहिती लोकांना हवी असते. हे सारं अनुभवण्याची संधी ‘लोकमत’ आयोजित पहिल्यावहिल्या ‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात लोकांना मिळाली होती. सोहळ्यात तारे-तारकांबरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावत आपली गुपितं उघड केली. खरं तर त्यांनी सांगितलेली ही गुपितं थक्क करणारी होती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तर थेट गर्लफ्रेंडबाबतचा खुलासा केला होता. होय, जेव्हा आदित्य ठाकरे यांना त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे अतिशय तोलूनमापून उत्तर दिले. गर्लफ्रेंडबद्दल सर्वात अगोदर तुम्ही कोणाशी बोलणार? असे विचारताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आईसोबत ही गोष्ट शेअर करणार असल्याचे म्हटले. याशिवाय त्यांनी प्रश्नांच्या रूपात आलेले सर्व बाउन्सर पॉलिटीकली डक केले. अभिनेत्री सई ताह्मणकरनेही तिची इच्छा अतिशय बिनधास्तपणे बोलून दाखवली. जेव्हा सईला, तुला कोणाबरोबर डेटवर जायला आवडेल? असे विचारण्यात आले तेव्हा तिने भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासोबत डेटवर जायला आवडेल, असे सांगितले. सईबरोबरच अमृता खानविलकर या अभिनेत्रीनेही आपल्या डेट पार्टनरचे सीक्रेट उघड केले. तिने अभिनेता रणवीरसिंहबद्दल तिच्या मनात असलेले प्रेम जाहीर केले. स्टाइल आयकॉन अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनम कपूरने पुरस्कार स्वीकारतानाच तिच्या या हटके स्टाइलचे सीक्रेट सांगितले. सोनमने, माझे वडील अनिल कपूरच माझे स्टाइल आयकॉन असल्याचे म्हटले होते. सोनमच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिला दादही दिली होती. स्टाइलच्या या सोहळ्यात शाल्मली खोलगडे या गायिकेचाही गौरव करण्यात आला. या वेळी शाल्मलीकडे तिच्या सुरेल आवाजाचा नजराणा पेश करण्याची फर्माइशही करण्यात आली. तिने ‘इश्क जादे’ या चित्रपटातील ‘मैं परेशान परेशान’ हे गाणं गात मैफलीत रंग भरला. तसेच या गाण्यामुळेच मला खर्‍या अर्थाने ओळख मिळाल्याचेही तिने स्पष्ट केले.  यंदाच्याही या रंगारंग सोहळ्यात सेलिब्रिटींच्या अशाच काहीशा सीक्रेटचा उलगडा होणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी होणार्‍या या सोहळ्यात इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. 

टॅग्स :lokmat.com family No. 1lokmat.com फॅमिली No. 1LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७