शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत स्टाईल’ अवॉर्डला सेलीब्रेटी लावणार हजेरी

By admin | Updated: January 29, 2017 13:18 IST

स्टाईल आणि स्टायलिश व्यक्तिमत्त्व याला नवे परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा लवकरच रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू

मुंबई : स्टाईल आणि स्टायलिश व्यक्तिमत्त्व याला नवे परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा लवकरच रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने (CNX) स्टायलिश पैलूंना हेरण्याचे ठरवले आहे. यासाठी कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचे आयोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या सोहळ्याला सुपरस्टार हृतिक रोशन, सोनम कपूर यांसारख्या अनेक बॉलीवूड सेलीब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे. तसेच शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील वेळात वेळ काढून या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या होममिनिस्टर म्हणजेच अमृता फडणवीस, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी सोनाली कुलकर्णीदेखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.

डॅशिंग अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या अनोख्या स्टाइलमुळे आणि नृत्य कौशल्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. टायगरदेखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार सोहळ्याला चारचाँद लावणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, आदिनाथ कोठारे, ऊर्मिला कानेटकर-कोठारे यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. अल्पावधीतच विविध प्रकारच्या भूमिका साकारून अभिनेत्री राधिका आपटेने रसिकांची मने जिंकलीत. राधिकादेखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. याशिवाय या आगळ्यावेगळ्या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, गुलशन ग्रोव्हर, डिनो मोर्या, उद्योगपती सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांचीही उपस्थिती लाभणार आहे. या सेलीब्रिटींच्या फॅशन स्टाईल, फॅशन स्टेटमेंटकडे आता साऱ्यांची नजर लागली आहे.