शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तब्बल १७ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:43 IST

देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला...

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा खंडा मर्दानी दसरा काल जल्लोषात साजरा झाला. तब्बल १६ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना भक्तीशक्तीची अनोख्या आनंदाची अनुभूती देवून गेला.नवरात्राची सांगता आणि घराघरातील घट उठल्यानंतर मंगळवारी ( दि.८) सायंकाळी ६ वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडार्‍याच्या उधळणीत खांदेकरी माणकऱ्यांनी देवाच्या उत्सव मुर्तीची पालखी उचलली. भंडार्‍याच्या उधळणीत देवाचा जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडरगृहातून देवाच्या उत्सवमूर्तीसेवेकर्‍यांनी पालखीत ठेवल्या, सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत आगेकूच केले. यावेळी गडाच्या सज्जातून भाविकांनी मुक्तहस्ताने भंडार्‍याची उधळणकेल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्ण नगरीचे स्वरूप आले होते.

मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ७.३० च्या दरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, अबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंड भैरवाचे मुळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघनासाठी निघाला. दोन्ही मंदिराच्यामध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्हीकडील विश्वस्त मंडळाकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय केली होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरील विद्यूत रोषणाई मनमोहक दिसत होती, दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती.

रात्रीच्या वेळी या सोहळ्यातील जल्लोष मर्दानी अनुभूती देत होता. यातच उत्सव मूर्तींच्या पालख्यासमोर होणार्‍या विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे तसेच फटाक्यांच्या आताषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते.शोभेच्या दारूकामाच्या लक्ख प्रकाशात जेजूरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खाली दरीत रमण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. पूर्णपणे डोंगराळ भाग असल्याने खांदेकर्‍यांना पालखी सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, त्यांच्या मदतीला धावणार्‍या हातांना ही चढ उतारावर कसरत करावी लागत होती, मात्र उत्सवाचा जल्लोष आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सारे काही सहजगत्या चालू होते, यावेळी वीरश्रीचा वेगळाच अनुभव उपस्थित भाविकांना येत होता. मर्दानी दसरा सण काय असतो याचा अनुभव भाविकांना येत होता. देहभान हरपून भाविक उत्सवाची अनुभूती घेत होते. मध्यरात्री जेजुरी गडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठारचा सोहळ्याने सुसरटींगी टेकडी सर केली, रात्री दीड वाजण्याचा सुमारास प्रचंड शोभेच्या दारूकामाच्या आताषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सवमूर्तींची देव भेट उरकली नि सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. 

तळ्याकाठी सोने लुटून भाविकांनी उत्सवमूर्तींना अर्पण करून दसर्‍याचे पारंपारिक महत्व जपले. सोहळ्याने पहाटे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीमार्गे गावात प्रवेश केला. ठिकठिकाणचे औक्षण स्वीकारत सोहळा जेजुरी नगरपालिका पटांगणावर पोहोचला. या ठिकाणी रावणदहन करण्यात आले. तेथून सोहळा मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. वाटेत घरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले. सकाळी ८ वाजता पालखी सोहळा गडाच्या साडे तीनशे पायर्‍यांची चढण चढून गडावर पोहोचला. सोहळ्यासमोरील सनई चौघडा, धनगरी ओव्या, सुंभरान, लोककलावंतांची भक्तीगीते, लावण्या, देवाची गाणी व नृत्य होत असल्याने आनंदाने वातावरण भरून गेले  भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले सोहळ्याची सांगता झाली.

खंडा ( तलवार) कसरत स्पर्धा..... दसरा उत्सवातील युवा वर्गाचा अत्यंत प्रिय सोहळा सुरू झाला. सुमारे ४३ किलोचा खंडा जास्तीतजास्त वेळ पेलून धरणे, त्याच्या कसरती करणे या स्पर्धेत सुमारे ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यातील जास्तीत जास्त वेळ खंडा तोलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश शेरे याने १७ मी.३४ सेकंद येवढावेळ खंडा तोलून प्रथम क्रमाक मिळवला, मंगेश चव्हाण (१३ मी.४१ से.) हेमंत माने (१३ मी.१४से.) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावले.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राDasaraदसरा