पुणो : किशोर पवार हे माङो 4क्-45 वर्षाचे जुने मित्र. काही न करून सत्ता मिळवणारी माणसे असतात. मात्र, असंख्य कामे करूनही पवारांना सत्तेचा मोह कधी पडला नाही, अशा शब्दांत त्यांच्या आठवणी ज्येष्ठ सेवादल नेते शिवाजीराव पाटील यांनी जागवल्या.
निमित्त होते, किशेर पवार यांच्या जयंतीनिमित्त साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणा:या समाजकार्य गौरव पुरस्कारांचे. पाटील यांच्या हस्ते हा पुरकार यंदा अंधश्रद्धा निमरूलन समिती आणि वनराई या संस्थांना देण्यात आला. याशिवाय, शवविच्छेदनाचे काम करणा:या शीतल चव्हाणचाही सन्मान करण्यात आला. अंनिसतर्फे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर आणि नितीन देशमुख यांनी; तर ‘वनराई’तर्फे रवींद्र धारिया आणि श्रीराम गोमतकर यांनी पुरस्कार स्वीकारला. शीतल चव्हाणचा सन्मान मोहिनी कारंडे यांनी स्वीकारला.
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकरांचे बलिदान हे विवेकवादासाठीचे आहे. विज्ञानाची आणि विवेकवादाची एकमेकांशी सांगड घालायचे मुख्य काम आपल्यापुढे आहे.’’ ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित म्हणाले, ‘‘आजचा काळ असा आहे, की सुगंधापेक्षा दरुगध लवकर पसरतो. त्यामुळे या पुरस्कारांचे महत्त्व आहे.’’
श्रीराम गोमतकर, मोहिनी कारंडे यांनीही सत्काराला उत्तर दिले. या वेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अंकुश काकडे, अध्यक्ष किरण ठाकूर यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)
डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर मोडून न पडता आम्ही काम सुरू ठेवायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या खुनाची चौकशी करण्यासाठी पुण्यासारख्या शहरात प्लॅँचेटचा उपयोग केला जातो, यावरूनच आमच्यापुढचे काम किती मोठे आहे, याची जाणीव होते. - अविनाश पाटील
किशोर पवारांनी आयुष्यभर माणसे जोडली. त्यामुळेच ते राज्यभरातील साखर कामगारांचे नेते बनले. कुठलीही चळवळ असली तरी त्यात झोकून देऊन काम करायचा त्यांचा स्वभाव होता. ‘वनराई’तर्फे मोहन धारियांनी पर्यावरणासंबंधीचा विचार खूप आधीपासून केला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘साधना’तून पुरागामी विचार प्रभावीपणो मांडले. त्यांचा मृत्यू नाही तर खूनच झाला आहे, असे म्हणायला हवे.
- शिवाजीराव पाटील, ज्येष्ठ सेवादल नेते