ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - सर्व महाविद्यालयांनी मराठी भाषा दिवस साजरा करावा असे आदेश मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.
मराठी भाषा दिवस साजरा करणे अनिवार्य असल्याचे मुंबई विद्यापीठाने सांगितले असून मराठी भाषा दिवस साजरा केल्याचा अहवाल विद्यापीठाला सादर कारावा लागणार आहे. अमराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे या करता हा निर्णय घेतला असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना २१ फेब्रुवारी रोजी मातृभाषा दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.