शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा आदर राखूनच दहीहंडी साजरी करा

By admin | Updated: June 21, 2016 03:46 IST

दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असावी आणि १२ वर्षांवरील गोविंदांना पथकात सहभागी होता यावे, अशी भूमिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई : दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असावी आणि १२ वर्षांवरील गोविंदांना पथकात सहभागी होता यावे, अशी भूमिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडली पण ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या मर्यादेत राहूनच उत्सव साजरा करा’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शेलार यांच्या भूमिकेला छेद दिला. दहीहंडी आणि गणेशोत्सव आयोजनातील कायदेशीर अडचणी आणि उपाययोजनांबाबत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मुख्यमंत्री म्हणाले की, पारंपारिक सणांचे स्वरु प बदलता कामा नये मात्र अशा प्रकारचे उत्सव साजरे करताना त्यामागची भावना लक्षात घेऊन ते साजरे केले पाहिजे. रस्त्यांवर मंडपांची उभारणी, ध्वनी प्रदूषण, दहीहंडी साजरी करताना सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने उत्सव साजरा करताना गणेशोत्सव आणि दहीहंडी पथकांना नाहक त्रास देऊ नये. दरवर्षीचे जी नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत त्यांना महापालिका आण िपोलिस प्रशासनाने स्वत:हून परवानगी देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबईमध्ये गणेश मुर्तीकारांना महापालिकेमार्फत जागा उपलब्ध करु न देण्यात येते. त्याचे दर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस नगरविकास, गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महाधिवक्ता रोहित देव, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)