शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सीडीआर प्रकरण : सेलीब्रिटींचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 05:40 IST

ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स) प्रकरणात चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांची नावे समोर येत आहेत. लवकरच या सेलीब्रिटींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

ठाणे - ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स) प्रकरणात चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांची नावे समोर येत आहेत. लवकरच या सेलीब्रिटींची चौकशी होण्याची शक्यता आहे.मोबाइल फोन्सचे सीडीआर बेकायदा मिळवणा-या आरोपींचे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले. काही खासगी गुप्तहेर आणि यवतमाळच्या एका पोलीस कर्मचा-यासह ११ आरोपींना पोलिसांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक केली. देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्या अटकेनंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले. ठाणे न्यायालयाने रजनी पंडित यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्या अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.या प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइल फोन हस्तगत केले. त्याआधारे आरोपींनी आजवर किती मोबाइलधारकांचे सीडीआर काढले आणि ते कुणाकुणाला पुरवले, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, आरोपींच्या ग्राहकांमध्ये काही सेलीब्रिटींचा समावेश असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या सेलीब्रिटींची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तसे संकेतही दिले आहेत. मात्र, या सेलीब्रिटींची नावे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांच्या रडारवर तीन सेलीब्रिटींची नावे आहेत. अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवलेल्या एका हिंदी चित्रपट अभिनेत्याचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय, एका नावाजलेल्या अभिनेत्याशी वाद झाल्यामुळे वेगळ्या कारणाने चर्चेत आलेल्या एका मोठ्या अभिनेत्रीचीही चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.मोबाइल कंपन्यांची चौकशी रखडलीसीडीआर प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी बेकायदेशीर मार्गाने सीडीआर मिळवण्यासाठी काही मोबाइल कंपन्यांच्या नोडल आॅफिसर्सशी हातमिळवणी केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. या मोबाइल कंपन्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, महिना उलटून गेला तरी पोलिसांनी अद्याप एकाही मोबाइल कंपनीच्या अधिकाºयांची या प्रकरणामध्ये चौकशी केलेली नाही.यवतमाळ पोलिसांच्या वेबसाइटचा नव्याने शुभारंभसीडीआर प्रकरणात पोलिसांनी यवतमाळ येथील सायबरतज्ज्ञ अजिंक्य नागरगोजे याच्यासह यवतमाळचा पोलीस शिपाई नितीन खवडे यालाही अटक केली होती. यवतमाळ पोलिसांची अधिकृत वेबसाइट अजिंक्यनेच तयार केली होती. त्या वेळी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरून अजिंक्यने काही सीडीआर मिळवले होते. विशेष म्हणजे त्याला ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर यवतमाळ पोलिसांची वेबसाइट हॅक झाली होती.मुख्य आरोपी फरारचसीडीआर प्रकरणाचा मुख्य आरोपी सौरव साहू हा दिल्ली येथील रहिवासी आहे. अशाच एका प्रकरणामध्ये त्याला यापूर्वीही एकदा अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतही सौरव साहूचे नाव समोर आले. तोच या प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी जाहीरही केले. त्यानंतर, सौरवच्या अटकेसाठी ठाणे पोलिसांचे पथक दिल्ली येथे जाऊन आले. मात्र, महिना उलटूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा