शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय इतके हतबल आहे?

By admin | Updated: January 8, 2016 02:38 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच बंदूक वापरण्यात आल्याचा दाट

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच बंदूक वापरण्यात आल्याचा दाट संशय असूनही सीबीआयला यासंदर्भातील बॅलिस्टिक अहवाल कर्नाटक पोलिसांकडून मिळवण्यात अपयश आले आहे. मात्र याबाबत उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. देशाची केंद्रीय तपास यंत्रणा एवढी हतबल आहे का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्याचे पोलीस महासंचालक व सीबीआयचे संचालक यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक व सीआयडी महासंचालकांच्या निदर्शनास ही बाब आणण्याचे निर्देश दिले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने तर पानसरेंच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) घटनास्थळावर सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या कर्नाटक पोलिसांना कलबुर्गींच्या हत्येच्या तपासात सहकार्य करण्यासाठी गेल्याच वर्षी पाठवल्या, अशी माहिती दोन्ही तपास यंत्रणेच्या वकिलांनी यांच्या खंडपीठाला दिली. दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या तिन्ही हत्यांसाठी एकाच बंदुकीचा वापर करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘बंगळुरू न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार, तिन्ही घटनास्थळांवरून जप्त करण्यात आलेल्या पुंगळ्या एकाच बंदुकीतून निघालेल्या आहेत, असे एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे,’ असे अ‍ॅड. नेवगी यांनी सांगितले.याबाबत विचारणा केली असता दोन्ही तपास यंत्रणांनी यात कितपत तथ्य आहे, हे आम्हाला माहीत नाही, असे खंडपीठाला सांगितले. ‘दोन्ही तपास यंत्रणांनी कर्नाटक सीआयडी महासंचालकांना पत्र लिहून अहवाल देण्याची विनंती केली. मात्र त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. तसेच कर्नाटकच्या एफएसएलनेही अहवाल देण्यास नकार दिला,’ असे सीबीआयचे वकील अनिल सिंग तर एसआयटीचे वकील संदीप शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले. ‘केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या तपास यंत्रणेला अहवाल कसा मिळाला नाही? सीबीआय अशा प्रकारच्या तक्रारी करत आहे, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. तसेच सीबीआयसारख्या तपास यंत्रणेला कर्नाटक पोलीस सहकार्य करीत नाहीत, याचेही आश्चर्य वाटते. कर्नाटक पोलिसांच्या असहकार्यामुळे तपास खोळंबला आहे,’ असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)