अहमदनगर : जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांच्या हत्येच्या तपासाला पोलिसांना आणखी माफक वेळ दिला जाईल. या कालावधीत पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, तर तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सकाळी जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मुख्यमंत्री म्हणाले, कोणावरही चुकीची कारवाई होणार नाही, याकडेही माझे लक्ष आहे. खऱ्या मारेकऱ्यांनाच पकडले जाईल. पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आहे. एका निश्चित कालावधीत पोलीस तपास पूर्ण करतील. दिलेल्या वेळेत तपास पूर्ण झाला नाही, तर तो सीबीआयकडे सोपविण्याबाबत विचार करता येईल. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)
...तर तपास सीबीआयकडे !
By admin | Updated: December 1, 2014 14:45 IST