शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बीटी कॉटन कंपन्यांची सीबीआय चौकशी; पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये आढळून आले ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 07:16 IST

राज्यातील पाच नामांकित बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे घटक आढळून आले आहेत. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

मुंबई : राज्यातील पाच नामांकित बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे घटक आढळून आले आहेत. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सखोल अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. अहवालानुसार पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले. हे घटक असलेले बियाणे मोठ्या प्रमाणात विकण्यात आले. त्याला केंद्र व राज्य सरकारची परवानगी नव्हती. मात्र त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला.हर्बिसाईड टॉलरन्स जीन्समुळेकापसावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आणि त्यामुळे शेतकºयांना किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागला. किटकनाशकांच्या फवारणीमुळे अलिकडे विशेषत: विदर्भात शेतकºयांचा मृत्यू झाला.सदोष बियाणे वितरित‘हर्बिसाईड टॉलरन्ट’ हे जीन्स पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. बियाण्यांची क्षेत्रीय चाचणी सीईएजी, सीआयसीआर संस्थांच्या देखरेखीखाली महिको मोन्सॅन्टोकडून करण्यात आली. त्यानुसार या पाचही कंपन्यांविरुद्ध नागपूरला एफआयआर नोंदविला आहे. तथापि, अशा बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यांत होते. त्यामुळे व्यापक चौकशी होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले असून या प्रकारणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :cottonकापूस