शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयच्या आरोपपत्रामुळे योग्य ते समोर येईल- हमीद दाभोळकर

By admin | Updated: September 7, 2016 17:28 IST

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 7 - बुधवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे. याबरोबरच सारंग अकोलकर आणि विनय पवार हेही या कटामधील प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले होते. मात्र आता याचे पुरावेही सीबीआयच्या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला तोंडी सांगण्यात आले आहे. अजून चार्जशीट हाती पडलेली नसून ती हाती आल्यावर जास्त योग्यरितीने यावर भाष्य करता येईल. परंतु सारंग अकोलकर आणि विनय पवार हे या प्रकरणातील प्रमुख संशयित असतील तर त्यांचा शोध तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. हे दोघेही २००९ पासून फरार असून, जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत यासारखे आणखी गुन्हे होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि सीबीआय या दोन सर्वोच्च तपास यंत्रणा असून त्यांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. याबरोबर कलबुर्गी आणि पानसरे या दोघांच्याही खुनाचा या सर्व गोष्टींशी काय संबंध आहे याचीही कसून चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. ते पुढे म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडा अशी मागणी आम्ही सुरुवातीपासूनच करत होतो. तसे न झाल्यास येत्या काळात आणखी हत्या होतील असेही आम्ही वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या. मात्र या खूनेकऱ्यांना पकडा आणि त्यांना शिक्षा द्या अशीच आमची मागणी आहे. या सगळ्या प्रकरणात सनातन संस्था किंवा हिंदू जनजागरण समिती काय म्हणते याबाबत आम्हाला काही घेणे देणे नाही. सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीटमुळे सगळ्या गोष्टी उघड झाल्या आहेत.